मुंबई : न्यायालयीन कोठडीत हिन दर्जाची वागणुक मिळत असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर केला. त्यानंतर लगेच मुंबई पोलिसांनी यांसदर्भात एक व्हिडीओ ट्विट करत नवनीत राणा यांच्या आरोपाची सत्यता बाहेर आली. त्यानंतर आता नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार टिका केली जात आहे.
“शरद पवारांनी जातीयवादाला खतपाणी घातलं, म्हणून प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला”
गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. परंतु मुंबी पोलीस आयुक्तांनी थेट पुरावे देऊन राणांचं तोंड बंद केलं. तपास यंत्रणांवर हल्ला करून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. अशा प्रकराच्या कामाच्या पद्धती या अतिरेक्यांच्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे एक सक्षम अधिकारी आहेत. राणांच्या संदर्भाने त्यांच्याविरूद्ध जो आरोप झाला तो अतिशय खोटा होता. खुद्द त्यांनीच व्हिडीओ ट्विट करून राणांचा खोटारडेपणा जगासमोर उघड केला. मी त्यांचे जाहीर आभार मानतो असंही संजय राऊत म्हणाले.
“औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेदरम्यान जमावबंदीचे आदेश नाहीत”; आयुक्तांनी केलं स्पष्ट
ते पुढे बोलताना म्हणाले की, राणा दाम्पत्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे. असं असतानाही माझी जात काढली म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपात अजिबात दम नव्हता. तेच मुंबई पोलीस आयुक्तांनी पुराव्यांनिशी दाखवलं. त्यांच समर्थन करणारा राज्यातील विरोधी पक्षही तोंडघशी पडला असा टोला देखील संजय राऊतांनी नवनीत राणा आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ! कोठडीतील मुक्काम वाढला
दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात नवनीत राणा आणि रवी राणा हे चहा पिताना दिसत आहेत. त्याआधी तुरूंगात मला पाणी देखील पिण्यासाठी दिलं जात नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर लावला होता. त्यामुळे नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांबाबत किती तथ्य आहे. ते आता पहाणं गरजेचं आहे.
Read also:
- महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे; शिवसेनेकडून राणांना खोचक टोला
- मोदींनीच सांगितलं की, पवारांच्या हाताला धरून राजकारण शिकलो, मग यात जातीयपणा कसला?
- देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता! गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चांदिवाल आयोगाचा अहवाल
- “शकुनीमामाच्या कौरव सेनांवर फडणवीसांच्या नेतृत्वात पांडवांची सेना जिंकणार”; सदाभाऊंचा शरद पवारांवर खोचक टोला
- नवनीत राणांच्या आरोपांवर पोलिसांनी केला पुराव्यांसह व्हिडीओ पोस्ट! राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता