मुंबई : मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यास आलेले राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. मात्र तुरूंगात हिन दर्जाची वागणूक मिळत असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला होता. त्यावर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातील एक सीसीटिव्ही फुटेज ट्विट केला आहे. त्यात नवनीत राणा या पोलिस ठाण्यात चहा पिताना दिसत आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
“औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेदरम्यान जमावबंदीचे आदेश नाहीत”; आयुक्तांनी केलं स्पष्ट
नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधताना मनिषा कायंदे म्हणाले की, लाज वाटायला हवी नवनीत राणा यांना. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे. अर्थात तुमच्याकडून कसली अपेक्षा करावी? असा खोचक टोला देखील त्यांनी नवनीत राणा यांना लगावला आहे.
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ! कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातील व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात नवनीत राणा आणि रवी राणा खुर्चीवर बसून चहा पीताना दिसत आहे. त्यात त्यांनी Do we say santhing More असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर केलेले आरोप कितपत खरं खोटे आहेत. याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
“ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झालीय, आगडोंब उसळलाय, जळजळतंय त्यांनी..;” मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, तुरूंगात होत असलेल्या अत्याचाराबाबत नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना देखील पत्र पाठवलं होतं. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी याबाबत राज्य सरकारला विचारणा ही केली. याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे यांनी सांगितलं होतं की, नवनीत राणा यांना कोणत्याही प्रकराची वाईट वागणूक देण्यात आली नाही. त्यामुळे नवनीत राणा यांनी पोलिसांवर जे काही आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Read also:
- मोदींनीच सांगितलं की, पवारांच्या हाताला धरून राजकारण शिकलो, मग यात जातीयपणा कसला?
- देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता! गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चांदिवाल आयोगाचा अहवाल
- “शकुनीमामाच्या कौरव सेनांवर फडणवीसांच्या नेतृत्वात पांडवांची सेना जिंकणार”; सदाभाऊंचा शरद पवारांवर खोचक टोला
- नवनीत राणांच्या आरोपांवर पोलिसांनी केला पुराव्यांसह व्हिडीओ पोस्ट! राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
- “शरद पवारांनी जातीयवादाला खतपाणी घातलं, म्हणून प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला”