मुंबई : देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील मुख्यमंत्र्यांच्या बैठक घेतली. यावेळी सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिडेलच्या दरांवरून विरोधी पक्षांना मोदींनी लक्ष्य केले. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांनी मुळ विषय सोडून बिगरभाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना टोमणे मारले असं त्यांनी त्यांच्यावर टिका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत कोरोनासंदर्भात परिस्थितीवर मार्गदर्शन करणार होते. परंतु पंतप्रधानांनी इतर विषयांवरच तारा छेडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर आणि ममता बॅनर्जी यांचे वक्तव्ये पाहता कालचा संवाद एकतर्फीच होता. असे म्हणावे लागेल. या बैठकीत बिगरभाजप राज्यांना टोमणे मारण्याचेच काम जास्त झाले. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका वेगळी असते असंही ते म्हणालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना महागाई दरवाढीवरून चांगलाचं सुनावलं. महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावीस असा आग्रह आपण गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केला होता. त्यावेळी केंद्राने आयात शुल्कात केलेल्या कपातीचेही स्मरण त्यांनी करून दिले. काही राज्यांनी मूल्यवर्धित कर कमी केला. परंतु काही राज्यांनी आपल्या जनतेला हा लाभ नाही दिला. असं मोदीं म्हणाले होते.
दरम्यान, सध्या राज्यात एव्हाना देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल- डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. तर सीएऩजी गॅसच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तर काही ठिकाणी कोरोना रूग्णसंख्या देखील वाढत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक घेतली होती.
Read also:
- “आजकल गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु रोज टिव्हीवर..;” फडणवीसांचा शिवसेनेला टोला
- अखेर 18 दिवसांनी गुणरत्ने सदावर्तेंची तुरूंगातून सुटका! म्हणाले, “मी मरायला देखील तयार आहे…;”
- ..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
- नवनीत राणांचा ‘डी गॅंगशी’ आर्थिक व्यवहार! संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
- आधी पाणी नाकारलं, वाद केल्यानंतर तो शांत करण्यासाठी चहा दिला का? भाजपचा राज्य सरकारला सवाल
- “राणांचं समर्थन करणारा राज्यातील विरोधी पक्षही तोंडघशी पडला”; संजय राऊतांचा खोचक टोला