मुंबई : राज्यात 1 मे महाराष्ट्र दिनी राज्यात राजकीय नेत्यांच्या सभेने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे विराट सभा होत आहे. तर मुंबईत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा पार पडत असून राज्य सरकारला घेरण्याची शक्यता आहे. अशातच त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुण्यात सभा होण्याची शक्यता आहे.
..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषेद सांगितलं की, राज्य सरकारविरोधात आम्ही मुंबईतील सोमय्या मैदानावर सभा घेत आहोत. त्या सभेला आम्ही बुस्टर डोस हे नाव दिलं असून राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराचा पोलखोल करणार आहोत. यावेळी मोठ्या संख्यंने कार्यकर्ते येणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेनेसह महाविकास आघाडील बुस्टर डोस देण्यात येईल असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
नवनीत राणांचा ‘डी गॅंगशी’ आर्थिक व्यवहार! संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा होत आहे. गुढीपाडव्याची मुंबईतील सभा आणि त्यानंतर ठाण्यातील सभेतील घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्यावर सडकून टिका करण्यात आली. त्यामुळे राज ठाकरे या सभेत नेमकी काय भूमिका घेणार आणि राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम देखील त्याच दिवशी संपणार आहे. त्यामुळे राज ठाकरे या सभेत मोठ्या प्रमाणात गरजण्याची शक्यता आहे.
आधी पाणी नाकारलं, वाद केल्यानंतर तो शांत करण्यासाठी चहा दिला का? भाजपचा राज्य सरकारला सवाल
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील त्याच दिवशी पुण्यात सभा होणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनी राज्यात सभांचा पाऊस पडणार असून एकमेकांवर जोरदार टिकाटिप्पणी होण्याची शक्यता आहे.
Read also:
- योगीचं कौतुक तर राज्य सरकारवर कडाडून टिका! राज ठाकरे, म्हणाले, “राज्यात योगी, नाहीतर सत्तेेचे भोगी”
- देशातील वातावरण बिघडण्याचे काम होत असेल तर..; शरद पवारांनी विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
- “मोदींनी मुळ विषय सोडून इतर विषयांवरच तारा छेडल्या”; राऊतांनी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून छेडले
- “आजकल गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु रोज टिव्हीवर..;” फडणवीसांचा शिवसेनेला टोला
- अखेर 18 दिवसांनी गुणरत्ने सदावर्तेंची तुरूंगातून सुटका! म्हणाले, “मी मरायला देखील तयार आहे…;”