मुंबई : अमरावती जिल्ह्याच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. कारण नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात आणखी एक व्हिडीओ पोस्ट होणार असल्याचं शिवसेना खासदार कृपाल तुमने यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज त्या व्हिडीओमध्ये काय असणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तर राणा दाम्पत्य आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
“आजकल गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु रोज टिव्हीवर..;” फडणवीसांचा शिवसेनेला टोला
तुरूंगात मला हिन दर्जाची वागणून मिळत असून मला पाणी देखील दिलं जात नाही असा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या पत्रात केला होता. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी यांसदर्भात एक व्हिडीओ पोस्ट करत नवनीत राणांची पोलखोल केली. पोलीस ठाण्यात नवनीत राणा आणि रवी राणा हे चहा पितानाचा व्हिडीओ संजय पांडे यांनी पोस्ट करत नवनीत राणांचे सर्व आरोप खोडून काढले होते.
अखेर 18 दिवसांनी गुणरत्ने सदावर्तेंची तुरूंगातून सुटका! म्हणाले, “मी मरायला देखील तयार आहे…;”
त्यानंतर शिवसेना खासदार कृपाल तुमने यांनी सांगितलं की, राणा दाम्पत्याविरोधात अजून एक व्हिडीओ आज दुपारी 3 वाजता येत आहे. नवनीत राणा यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर केलेल्या आरोपा संदर्भातील हा व्हिडीओ आहे. राणा दाम्पत्यांनी परमेश्वरांच्या नावाने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील तुमने यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबाबत काय व्हिडीओमध्ये असणार त्यांचं औत्सुक्य सगळ्यांना लागून आहे.
..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले, परंतु शिवसैनिकांनी त्यांना मातोश्रीजवळ देखील जाऊ दिलं नाही. अशातच त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर आता न्यायालयात उद्य़ा सुनावणी होणार आहे.
Read also:
- राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडणार! ‘या’ तारखांना उमेदवारांच्या अंगावर गुलाल उधळणार ?
- राज ठाकरे औरंगाबादमध्ये गरजणार! तर फडणवीसांची मुंबईत ‘बुस्टर डोस’ सभा; 1 मे रोजी राज्यात ‘राजकारण’ तापणार
- योगीचं कौतुक तर राज्य सरकारवर कडाडून टिका! राज ठाकरे, म्हणाले, “राज्यात योगी, नाहीतर सत्तेेचे भोगी”
- देशातील वातावरण बिघडण्याचे काम होत असेल तर..; शरद पवारांनी विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
- “मोदींनी मुळ विषय सोडून इतर विषयांवरच तारा छेडल्या”; राऊतांनी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून छेडले