चंद्रपुर : शिवसेनेसोबत भाजपचे अनेक वर्षापासूनचे संबंध आणि समन्वय असल्याने आम्ही 2014 साली शिवसेनेसोबत जाण्याचा विचार केला. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा अदृश्य हात होता हे खंर आहे. राष्ट्रवादीसोबत सरकार होईल यासंदर्भात त्यावेळी चर्चा होत्या. परंतु शिवसेनेला सोडून सरकार बनवनं हे आमचा विचार नव्हता. आशिष शेलार यांनी जे काही म्हटलं आहे. त्यात तथ्य आहे. त्यात चुक झाली, प्रायश्चित तर भोगतो आहे, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
नवनीत राणा यांची सध्या आर्थिक चौकशी सुरू होत आहे. त्यावर बोलताना म्हणाले की, जेव्हा तुमची आर्थिक चौकशी होते. तेव्हा फक्त रडू नये. एवढीच फक्त अपेक्षा आहे. यांसदर्भात त्यांनी काय चौकशी करायच्या त्या कराव्यात. परंतु त्यानंतर झुकेगा नहीं, महाराष्ट्र दिल्लीला घाबरत नाही. हे डॉयलाग फेकणं बंद झालं पाहिजे. चौकशी करताना जो तर्क राणा कुटुंबाशी लावताना करतात. तो तर्क तुम्ही इतरांसोबत राबवावा. अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
योगीचं कौतुक तर राज्य सरकारवर कडाडून टिका! राज ठाकरे, म्हणाले, “राज्यात योगी, नाहीतर सत्तेेचे भोगी”
महाविकास आघाडी सरकारने नवीन व्यवस्था सुरू केली आहे. सुरूवातीला एक नेता खोटं बोलतो. पहिली एक म्हण होती. खोेटं बोल पण रेटून बोलं. परंतु आता नवीन म्हण आली आहे. खोटं बोल पण ठरवून बोल, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. त्यानंतर त्या खोटं बोलणाऱ्या नेत्यांना आधार देण्यासाठी नेत्यांची लाईन लागते. त्यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेल करांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील निशाणा साधला.
देशातील वातावरण बिघडण्याचे काम होत असेल तर..; शरद पवारांनी विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, राज्यात 2014 साली शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस असा सरकार बनवण्याचा प्लॅन होता. राष्ट्रवादीने शिवसेने सोबत घेण्याचा विरोध केला होता. पंरतु शिवसेनेची जेव्हा वेळ आली तेव्हा ते आम्हाल सोडून गेले. असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, 2014 मध्ये आम्ही स्वतंत्र्य निवडणुका लढवल्या होत्या. शिवसेनेला सोडून सरकार यावं असं आमचं मत होतं. कारण शिवसेनेचं आणि आमचं पटत नव्हतं. अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली.
Read also:
- पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत अजित पवार लवकरच गुड न्युज देणार! म्हणाले, पुढच्या दोन तीन महिन्यात..;
- “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी पवार साहेबांना ‘जातीयवादी’ म्हटले असते का?”
- राणा दाम्पत्याविरोधात आणखी एक ‘व्हिडीओ बॉम्ब’ फुटणार! शिवसेना खासदारांनी दिला ‘हा’ इशारा
- राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडणार! ‘या’ तारखांना उमेदवारांच्या अंगावर गुलाल उधळणार ?