मुंबई : मशिदीवरील आणि धार्मिक स्थळावरील भोंगे खाली उतरवल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. तर महाविकास आघाडी सरकावर कडाडून टिका केली आहे. त्यावर आता शिवसेनेकडून खोचक शब्दात प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यावरून संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
राणा दाम्पत्याविरोधात आणखी एक ‘व्हिडीओ बॉम्ब’ फुटणार! शिवसेना खासदारांनी दिला ‘हा’ इशारा
संदिप देशपांडे म्हणाले की, धार्मिक तेढ कुणाकडून निर्माण होते? राज ठाकरे म्हणतात की जो न्यायालयाचा आदेश आहे, त्याचं पालन सरकारने करायला हवं. न्यायालयाच्या आदेशाचं पालनं करायला पाहिजे म्हणणारे लोक धार्मिक तेढ कसे निर्माण करतात. हे सरकारने स्पष्ट करायला हवं. असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच जे लोक म्हणातायत की न्यायलयाच्या आदेशाचं पालन करणार नाही, डेसिबलचं पालन करणार नाही. त्या लोकांना सांगायला हवं की धार्मिक तेढ निर्माण करू नका. आम्ही नियमांचं पालन करतोय. जे पालन करणार नाही, त्यांना शिकवण्याची गरज आहे. त्यांना पोलिसांना नोटीस देण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडणार! ‘या’ तारखांना उमेदवारांच्या अंगावर गुलाल उधळणार ?
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करताना एक ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील , विशेषता:मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. असं त्यांनी ट्विट करत योगीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहेत. या सभेला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला भीम आर्मीनं आक्षेप घेतला आहे. तर राज ठाकरे यांच्या सभेला काही नियमावली देखील घालून दिली आहे. त्या नियमावलीत, महाराष्ट्र दिन असल्यानं जात, पात धर्म, प्रांत इत्यादींवर वक्तव्य करता येणार नाही. तसेच सभेपुर्वी रॅली अथवा मिरवणुक काढता येणार नाही. तसेच लहान मुलं, वृद्ध यांना कसलाही त्रास होणार नाही, अशी अटी घालून दिल्या आहेत.
Read also:
- “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी योगींचं अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी”; मनिषा कायंदे
- “शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही, त्याची चुक आम्ही भोगतोय”; सुधीर मुनगंटीवारांची खंत
- पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत अजित पवार लवकरच गुड न्युज देणार! म्हणाले, पुढच्या दोन तीन महिन्यात..;
- “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी पवार साहेबांना ‘जातीयवादी’ म्हटले असते का?”