मुंबई : भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे यांच्याकडे कंत्राट असल्याने त्यांना काही समजल नाही. त्यांनी योगींना फोन करून स्पष्टोव्यक्ती घ्यायला पाहिजे होती. अशा पद्धतीने राज ठाकरे तोंडाशी पडले आहेत. तसेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती. मशिदीवरील नव्हे तरमंदिरावरील देखील अनधिकृत भोंगे योगी यांनी खाली उतरवले आहेत. असा टोला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडणार! ‘या’ तारखांना उमेदवारांच्या अंगावर गुलाल उधळणार ?
उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील , विशेषता: मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. असं त्यांनी ट्विट करत राज ठाकरे यांनी योगीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
मशिदीवरील तसेच धार्मिक स्थळावरील भोंगे खाली उतरवले म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घाईघाईने पत्र पाठवले. परंतु त्यांच्या हे लक्षात आलं नाही की,सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार जे अनधिकृत भोंगे होते. ते त्यांनी खाली उतरवले. मशिदीवरील भोंगे खाली उतरले तसे मंदिरांवरील देखील उतरले आहेत. त्यामुळे राज ठाकरे सध्या हनुमान चालिसा पठणामध्ये व्यस्त असल्याने त्यामुळे त्यांनी नीट वाचलं नाही. त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
योगीचं कौतुक तर राज्य सरकारवर कडाडून टिका! राज ठाकरे, म्हणाले, “राज्यात योगी, नाहीतर सत्तेेचे भोगी”
दरम्यान, अलिकडेच गृहमंत्र्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आणि राज्यातील परिस्थितीबाबत महत्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत मशिदीवरील भोंगे कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावरून राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर मनसे ठाम राहिले. त्यामुळे येत्या 3 मे नंतर मनसे काय भूमिका घेणार त्याकडे लक्ष आहे. तर औरंगाबाद येथे जवळपास 1601 अनधिकृत धार्मिक स्थळांवर भोंगे आहेत. त्याबाबत सरकार काय भूमिका घेणार ते पण आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही, त्याची चुक आम्ही भोगतोय”; सुधीर मुनगंटीवारांची खंत
- पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत अजित पवार लवकरच गुड न्युज देणार! म्हणाले, पुढच्या दोन तीन महिन्यात..;
- “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी पवार साहेबांना ‘जातीयवादी’ म्हटले असते का?”
- राणा दाम्पत्याविरोधात आणखी एक ‘व्हिडीओ बॉम्ब’ फुटणार! शिवसेना खासदारांनी दिला ‘हा’ इशारा