मुंबई : कोरोना स्थितीच्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी बिगरभाजप राज्यातील मुख्यमंत्रांना जोरदार टोमणे मारले. शिवसेनेच्या सामाना वर्तमानपत्रातून देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्यात आली आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सावत्रपणाची वागणुक देत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. यावर पुण्याचे तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत अजित पवार लवकरच गुड न्युज देणार! म्हणाले, पुढच्या दोन तीन महिन्यात..;
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, खासदार संजय राऊतांना आपण खरचं सर्वज्ञानी आहोत, हे वाटायला लागलंय की काय? अकलेचा आणि तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलेचे बूम आणि ठोकली काहीही धूम, असं ट्विट त्यांनी संजय राऊतांविरोधात केलं आहे. त्यामुळे यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे.
“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
ज्या ठिकाणी तुमचं सरकार नाही त्या मुख्यमंत्र्यांच्याबाबत तुम्ही द्वेष पूर्ण बोलायला नको. आम्हालाही स्वाभिमान आहे. पंतप्रधानांना सामनातून लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे ही अपेक्षा नव्हती. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात. तर संपुर्ण देशाचे असतात. ज्या राज्यात सरकार नाही. त्याबाबत संवेदनशील असलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने सावत्रपणाची वागणूक मिळते. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. म्हणून उद्धव ठाकरे आणि ममती बॅनर्जी यांनी आवाज उठवला आहे, अंस त्यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.
“मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी पवार साहेबांना ‘जातीयवादी’ म्हटले असते का?”
भोंग्याबाबत जी सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतली आहे, तीच भूमिका राज्य सरकारची आहे. महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आलं आहे. भोंग्याचा विषय राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही राजकीय भोंगेबाजी असून आता योगी कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन अचानक कसं झालं? हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने यावर पीएचडी करायला हवी, असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read also:
- ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी”से ; अमृता फडणवीसांना युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर
- “भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकारायचं असेल तर..;” रोहित पवारांचा भाजपला सल्ला
- “आम्ही नियमाचं पालन करणार, मात्र जे करणार नाही, त्यांचं काय? मनसेकडून राज्य सरकारला सवाल
- “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी योगींचं अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी”; मनिषा कायंदे
- “शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही, त्याची चुक आम्ही भोगतोय”; सुधीर मुनगंटीवारांची खंत