मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भरभरून अभिनंदन आणि आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशमधील मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा योगी सरकारने निर्णय घेतला आहे. त्यावरून राज ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तर यावर शिवसेनेने देखील अमृता फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे की,ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से. त्यावर शिवसेनेच्या युवा नेत्या शितल शेठ हिने अमृता फडणवीस यांना जोरदार टोला लगावत निशाणा साधला आहे. यासंदर्भात तिने एक ट्विट देखील केलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की, ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी” से. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील , विशेषता:मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक राज ठाकरे यांनी अभिनंदन आणि आभार. असं त्यांनी ट्विट करत योगीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
“मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी पवार साहेबांना ‘जातीयवादी’ म्हटले असते का?”
महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबचरणी प्रार्थना. असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथे सभा होत आहे. त्या सभेत राज ठाकरे विरोधकांवर तसेच राज्यातील परिस्थितीबाबत काय बोलणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
राणा दाम्पत्याविरोधात आणखी एक ‘व्हिडीओ बॉम्ब’ फुटणार! शिवसेना खासदारांनी दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, अलिकडेच गृहमंत्र्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आणि राज्यातील परिस्थितीबाबत महत्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत मशिदीवरील भोंगे कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावरून राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर मनसे ठाम राहिले. त्यामुळे येत्या 3 मे नंतर मनसे काय भूमिका घेणार त्याकडे लक्ष आहे. तर औरंगाबाद येथे जवळपास 1601 अनधिकृत धार्मिक स्थळांवर भोंगे आहेत. त्याबाबत सरकार काय भूमिका घेणार ते पण आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकारायचं असेल तर..;” रोहित पवारांचा भाजपला सल्ला
- “आम्ही नियमाचं पालन करणार, मात्र जे करणार नाही, त्यांचं काय? मनसेकडून राज्य सरकारला सवाल
- “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी योगींचं अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी”; मनिषा कायंदे
- “शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही, त्याची चुक आम्ही भोगतोय”; सुधीर मुनगंटीवारांची खंत
- पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत अजित पवार लवकरच गुड न्युज देणार! म्हणाले, पुढच्या दोन तीन महिन्यात..;