रत्नागिरी : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्हीं बाजूंनी आरोपाच्या फैऱ्या आणि टिकात्मक टिप्पणी करायला दोन्ही बाजूचे राजकीय नेते विसरत नाहीत. त्यामुळे भाजप आणि सत्ताधारी पक्षांत चांगलाचं कलगीतुरा बघायला मिळत आहे. अशातच आता मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
“आम्ही नियमाचं पालन करणार, मात्र जे करणार नाही, त्यांचं काय? मनसेकडून राज्य सरकारला सवाल
राज्य सरकारने 28 एप्रिल 2022 चा येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा फोटो आणि त्यावर मंत्रिमंडळ निर्णय असलेला फोटो निलेश राणे यांनी ट्विट केला आहे. नवाब मलिक सध्या मनी लॉ़ण्ड्रिंग प्रकरणी तुरूंगात आहेत. त्यांचा पदभार देखील इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यावरून निलेश राणेंनी खोचक टिप्पणी केली आहे.
नवाब मलिक यांचा फोटोसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो आहे. त्यावरून ते म्हणाले की, काय शोकांतिका आहे. हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्याप्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय. असं ट्विट करत निलेश राणेंनी निशाणा साधला आहे.
“शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही, त्याची चुक आम्ही भोगतोय”; सुधीर मुनगंटीवारांची खंत
दरम्यान, इब्राहिम दाऊदशी संबंधित जमीन व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा कारभार देखील महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडे सोपवला आहे. अशातच आता मंत्रिंडळाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यावर नवाब मलिक यांचा फोटो असल्याने त्यावर टिका टिप्पणी केली जात आहे.
Read also:
- “पुरी ताकद से बताएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए ! इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीचं अनोखे आंदोलन
- “पंतप्रधानांनाकडून सावत्रपणाची वागणूक मिळतेय”; संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका
- अकलेचा अन् तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम अन् ठोकली धूम
- ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी”से ; अमृता फडणवीसांना युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर
- “भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकारायचं असेल तर..;” रोहित पवारांचा भाजपला सल्ला