मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदीवरील अनधिकृत असलेले सर्व भोंगे खाली उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. त्यावरून राज ठाकरे यांच्यावर राज्यातील महाविकास आघाडीकडून जोरदार टिका केली जात आहे. अशातच आता संत तुकाराम महाराजांच्या अंभगाची ओवी ट्विट करत काॅंग्रेसने देखील राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“पुरी ताकद से बताएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए ! इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीचं अनोखे आंदोलन
काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, संत परंपरेच्या महाराष्ट्रात कोणीच योगी नाही, असे म्हणणे आणि महाराष्ट्रात अवघे सत्तेचे भोगी आहेत म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का? स्वार्थापोटी धर्माचा वापर करणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात. अल्प असे ज्ञान ! अंगी ताठा अभिमान ! तुका म्हणे अवघें सोंग ! तेथें कैंचा पांडुरंग! अंस म्हटलं आहे.
पंतप्रधानांनाकडून सावत्रपणाची वागणूक मिळतेय”; संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका
उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील , विशेषता: मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. असं ट्विट करत राज ठाकरे यांनी योगीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
अकलेचा अन् तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम अन् ठोकली धूम
दरम्यान, अलिकडेच गृहमंत्र्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आणि राज्यातील परिस्थितीबाबत महत्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत मशिदीवरील भोंगे कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावरून राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर मनसे ठाम राहिले. त्यामुळे येत्या 3 मे नंतर मनसे काय भूमिका घेणार त्याकडे लक्ष आहे. तर औरंगाबाद येथे जवळपास 1601 अनधिकृत धार्मिक स्थळांवर भोंगे आहेत. त्याबाबत सरकार काय भूमिका घेणार ते पण आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “भाजप-मनसे युतीच्या बातम्या काही लोकांनी सोडल्या, युतीसंदर्भात चर्चा नाही” ; देवेंद्र फडणवीस
- “मग शिवसेनेचे वैचारिक मतपरिवर्तन हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय”; चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
- “भाजप-मनसे युती झाली की नाही, तेच समजत नाही”; अजित पवारांची युतीसंदर्भात मिश्किल टिप्पणी
- “भाजप मनसेच्या युतीसंदर्भात संघ कधीही पुढाकार घेणार नाही”; भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा दावा
- “मंत्री जेलमध्ये तरीही महाराष्ट्र शासनाने निर्णय जाहीर केलाय”; निलेश राणेंची राज्य सरकारवर खोचक टिप्पणी