मुंबई : हाविकास आघाडी सरकारला केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पुरत उघड पाडलं आहे. 20 हजार कोटी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या व्हॅट करावर कमावले. मात्र ज्यावेळी हे दर कमी करण्याची वेळ आली आहे. तेव्हा वेगवेगळे बहाणे केले जात आहे. देशातील भाजपच्या सगळ्या राज्यातील मुख्यमंत्री पेट्रोलचे दर कमी केलेत. महाराष्ट्राच्या सीमेवरील गुजरात, गोवा आणि दिव दमनमध्ये दर हे महाराष्ट्रापेक्षा 15 रूपयांनी कमी आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार राज्यात दर कमी करत नाहीय. असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला.
पंतप्रधानांनाकडून सावत्रपणाची वागणूक मिळतेय”; संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका
राज्य सरकारने केलेली जीएसटी परताव्याची मागणी ही केंद्रीय राज्य वित्त मंत्र्यांनी पुराव्यासह सांगितलं आहे. त्यामुळे या सरकारने बहाणेबाजी बंद करून तत्काळ पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा दिला पाहिजे आणि आपला खोटारडेपणा बंद केला पाहिजे. असंही ते म्हणाले.
अकलेचा अन् तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम अन् ठोकली धूम
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप मनसेच्या युतीच्या बातम्या हा कपोलकल्पीत आहेत. या काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहेत. आमची त्यासंदर्भात कुठलीही औपचारीक चर्चा ही झालेली नाही. मात्र राज ठाकरे यांनी अलिकडील ज्या भूमिका घेतल्या आहेत. त्या आमच्या देखील भूमिका राहिल्या आहेत. तेपण मांडताहेत आम्ही देखील मांडतो आहोत. पंरतु युतीसंदर्भात कुठलाही असा फॉर्मल प्रस्ताव तयार झाला नाही.
ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी”से ; अमृता फडणवीसांना युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, अलिकडच्या काळात ज्या जातीय, संप्रादायकता यांचे जनकच सुडो सेक्युलर पक्ष आहेत. या सुडो सेक्युलर पक्षांनी लांगूनचालण्याच्या माध्यमातून बहुसंख्यांक आणि अल्पसंख्याकांची दरी निर्माण केली आहे आणि अल्पसंख्यांकाची लांगूनचालन करून त्यांची दुरभावना तयार केली आहे. नरेंद्र मोदींचं सगळ्यांना माहित आहे की सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास त्यामुळे मोदींच्या योजना सगळ्यांना लागू आहेत. ते जातधर्म पाहत नाही. मात्र काही लोक राजकारणासाठी अल्पसंख्याकांच लांगूनचालन करतात. त्यांच्यामुळे आज भारताची परिस्थिती बिघडत आहे. असंही ते म्हणाले.
Read also:
- “मग शिवसेनेचे वैचारिक मतपरिवर्तन हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय”; चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
- “भाजप-मनसे युती झाली की नाही, तेच समजत नाही”; अजित पवारांची युतीसंदर्भात मिश्किल टिप्पणी
- “भाजप मनसेच्या युतीसंदर्भात संघ कधीही पुढाकार घेणार नाही”; भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा दावा
- “मंत्री जेलमध्ये तरीही महाराष्ट्र शासनाने निर्णय जाहीर केलाय”; निलेश राणेंची राज्य सरकारवर खोचक टिप्पणी
- “पुरी ताकद से बताएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए ! इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीचं अनोखे आंदोलन