गडचिरोली : राज्य आणि देशात राजकीय पक्षांच्या अशा आघाड्या होत असतात. देशपातळीवर एनडीए आणि युपीए अशा आघाड्या आपण पाहिल्या आहेत. मनसे-भाजप यांची युती झाली की नाही, याबाबत संभ्रम आहे. परंतु सत्तेसाठी अशा युती आणि आघाड्या होत असतात, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-मनसे युतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर दिलं आहे. यावेळी ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलसह गडचिरोलीमध्ये दाखल झाले असता बोलत होते.
ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी”से ; अमृता फडणवीसांना युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर
गडचिरोली येथील मुख्यालयात पोलीस पथकाचा सन्मान सोहळा पार पडला. 13 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील मर्दिनटोला येथे झालेल्या चकमकीत 4 राज्यांचा नक्षल प्रमुख असलेला मिलिंद तेलतुंबडे टिपला गेला. त्यामुळे तेथील पोलीसांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सी 60 नक्षल विरोधी पथक जवानांच्या कमांडो भत्त्यात वाढ करण्याची घोषणा देखील अजित पवारांनी केली आहे.
देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र आजपर्यंत कुणीही हा भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला नव्हता. या प्रश्नापेक्षा लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न अधिक महत्वाचा असल्याचं सांगत अजित पवार यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य़ केलं. त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल देखील होते. यावेळी त्यांनी पोलीस स्मृती गॅलरीला भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली.
“आम्ही नियमाचं पालन करणार, मात्र जे करणार नाही, त्यांचं काय? मनसेकडून राज्य सरकारला सवाल
दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी भाजप मनसेसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र यावर आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. ते म्हणाले की, देशहितासाठी स्वयंसेवक घडवण्याचं काम आरएसएस करत असतं. भारतमातेच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतो. असं म्हणत त्यांनी संघाचं कौतुक करत विरोधकांना जोरदार टोला लगावला. भाजप मनसे युती होणार यात आरएसएस संघाचा हात असणार का? यावर त्यांनी आपले विचार मांडले. खुर्ची, राजकीय सत्ता या साऱ्या बाबी संघासमोर गौण आहेत. त्यामुळे भाजप मनसेच्या युतीसंदर्भात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ कधी पुढाकार घेणे किंवा मध्यस्थी म्हणून कार करणार नाही. त्यामुळे मनसेसोबत युती होणे सध्या तरी शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Read also:
- “भाजप मनसेच्या युतीसंदर्भात संघ कधीही पुढाकार घेणार नाही”; भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा दावा
- “मंत्री जेलमध्ये तरीही महाराष्ट्र शासनाने निर्णय जाहीर केलाय”; निलेश राणेंची राज्य सरकारवर खोचक टिप्पणी
- “पुरी ताकद से बताएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए ! इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीचं अनोखे आंदोलन
- “पंतप्रधानांनाकडून सावत्रपणाची वागणूक मिळतेय”; संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका
- अकलेचा अन् तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम अन् ठोकली धूम