मुंबई : मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्याच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसले असून त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व नामोहरम झाले आहे. राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून ते तयार झालेलं रसायन असून हिंदुत्वाला फुंकर घालण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्स होतं. हे भविष्यात आपल्याला पाहाहयला मिळेल. असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
“भाजप-मनसे युतीच्या बातम्या काही लोकांनी सोडल्या, युतीसंदर्भात चर्चा नाही” ; देवेंद्र फडणवीस
आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादी ह्यांची युती. राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत हे दोन चोरांचे साथीदार येऊन मिळाले आणि ह्या तिघांटा राज्यभर दरोडा सुरू आहे. अशी घणाघाती टिका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर केली आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी हिंदुत्वाच्या मुद्दयावरून शिवसेनेला देखील खोचक टोला लगावला.
गेल्या लोकसभेमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ असं म्हटलं की राष्ट्रवादीचे सगळे नेते हे टाळ्या वाजवत होते. आता तेच राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरती टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवत फिरतायत. तुटुन पडा असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला. असंही ते म्हणाले.
“भाजप-मनसे युती झाली की नाही, तेच समजत नाही”; अजित पवारांची युतीसंदर्भात मिश्किल टिप्पणी
दरम्यान, मागील काही दिवसापासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार टिकाटिप्पणी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं असून आगामी काळात या घटनांचा पुढे काय परिणाम होणार ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?
- “राज ठाकरे यांनी सभेपुर्वी इफ्तार पार्टीला यावं”; इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना आमंत्रण
- “राजकीय खेळात अनेकजण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करताहेत”; मनसे-भाजप युतीबाबत भुजबळांची प्रतिक्रिया
- “त्यांचे बंधू मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलंय”
- तुका म्हणे अवघें सोंग! तेथें कैंचा पांडुरंग; योगींचं कौतुक अन् काॅंग्रेसचा राज ठाकरेंवर निशाणा