औरंगाबाद : महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शहरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. त्यासभेकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे. कारण मागील दोन सभेत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे लावून धरला होता. त्यानंतरच्या सभेत त्यांनी टिकाकारांनाही प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांची सभा कोणत्या विषयावर धडकणार त्यांची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
“त्यांचे बंधू मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलंय”
राज ठाकरे यांनी येत्या 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्या भूमिकेवर ते आक्रमक आहेत. यावरून ते राज्य सरकारला सुचक इशारा देखील देऊ शकतात. त्यानंतर ते 5 जून ला आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांसंदर्भात देखील ते आपली भूमिका मांडू शकतात.
तुका म्हणे अवघें सोंग! तेथें कैंचा पांडुरंग; योगींचं कौतुक अन् काॅंग्रेसचा राज ठाकरेंवर निशाणा
मागील सभेत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडला होता. त्यावरून त्यांच्यावर राज्यातील अनेक नेत्यांनी टिका केली होती. परंतु त्यानंतरच्या सभेनंतर त्यांनी टिकाकारांना प्रत्युत्तर दिलं होतं. या सभेत देखील राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा लावून धऱण्याची शक्यता आहे. त्यानंतर औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत त्यांची सुरूवातीपासूनची आग्राहाची भूमिका राहिली आहे. त्यांनी ती वारंवार बोलून देखील दाखवली आहे.
“भाजप-मनसे युतीच्या बातम्या काही लोकांनी सोडल्या, युतीसंदर्भात चर्चा नाही” ; देवेंद्र फडणवीस
दरम्यान, औरंगाबाद शहरातील एमआयएमच्या वाढत्या ताकतीबद्दल राज ठाकरे टिकेची झोड उठवण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहाराच्या विकासाबद्दल ते त्यांना घेरण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील शिवसेनेचा गड आहे की नाही याबाबत तुफान फटकेबाजी पहायाला मिळणार आहे. तसेच खासदार इम्तियाज जलील यांनी इफ्तार पार्टीचं दिलेलं निमंत्रण याबाबत देखील ते समाचार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे औरंगाबादची सभा राज ठाकरे यांची ऐतिहासिक ठरणार आहे.
Read also:
- “…मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील”; संजय राऊतांचा विरोधकांना सुचक इशारा
- “राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत दोन चोरांचे साथीदार”; खोतांचा पुन्हा एकदा टोला
- “राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?
- “राज ठाकरे यांनी सभेपुर्वी इफ्तार पार्टीला यावं”; इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना आमंत्रण
- “राजकीय खेळात अनेकजण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करताहेत”; मनसे-भाजप युतीबाबत भुजबळांची प्रतिक्रिया