मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपची बुस्टर सभा पार पाडली. तर औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जातीय वादाचा मुद्दा पुन्हा त्यांनी बाहेर काढला. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
“तुमचे आमदार निवडून यावे म्हणून तुम्ही जातीय विष पसरवलं”; राज ठाकरेंची शरद पवारांवर टिका
शरद पवारांवर टिका करताना निलेश राणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस असू दे किंवा राज ठाकरे असू दे सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मी अजून पर्यंत एकही माणूनस पवार साहेबांबद्दल खाजगी मध्ये चांगलं बोलताना बघितलं नाही. आता तर लोकं उघड उघड बोलू लागले आहेत. असा टोला ही त्यांनी लगावला.
“नास्तिक बोललेलं पवारांना झोबलं, अन् त्यांनी देवाची पुजा करतानाचे फोटो काढले “; राज ठाकरे
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यात जातीय राजकारणाचं विष कालवण्याचं काम शरद पवारांनी केलं असल्याची टिका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी परत एकदा शरद पवारांचा नास्तिक म्हणून असल्याचा उल्लेख केला. तसेच त्यांनी काल काही पुस्तकांचा संदर्भ देत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. तसेच शिवसेनेवर टिका करताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ढिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार, दुराचार करता. त्यावेळी तुमचे साथी संवगडी तुरूंगात जातात. त्यावेळी महाराष्ट्र बदनाम होतो. त्यामुळे या महाराष्ट्राचं नाव संपुर्ण महाराष्ट्रात बदनाम होत आहे. त्यामुळे तुम्हाला शरम वाटली पाहिजे, महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावलायचं काम करताहेत. हेच काम महाविकास आघाडी सरकारमध्ये होताना दिसत आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. मशिदीवरील भोंगे काढायला लावले तेव्हा हातभर फाटली, अन् हेच सांगता आम्ही बाबरी मशिदी पाडली. असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read also:
- राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
- “मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
- “ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
- भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा पुन्हा अपघात; पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर थोडक्यात बचावले
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात! 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या