पुणे : प्रतिनिधी| संभाजी भिडे हे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. शिवप्रतिष्ठान ही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. तिचे भारतीय जनता पक्षाशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध अनेकदा समोर येतात आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. या अपघातात ते जखमी झाले होते. भिडे यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती आता स्थिर असून, राज्यातील अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी सांगलीत दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनीही भिडे यांची भेट घेतली आणि डॉक्टरांसोबत चर्चा करुन प्रकृतीची विचारपूस केली.
खोट पण रेटून कसं बोलावं, हे राज ठाकरेंकडून शिकावं; श्रीमंत कोकाट्यांचा राज ठाकरेंवर घणाघात
गेल्या आठवड्यात संभाजी भिडे गुरुजी हे सायकलवरून गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी निघाले होते. दरम्यान, काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपण चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या खुब्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ. देशपांडे यांच्या नियंत्रणात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी भिडे यांची रुग्णालयात भेट घेतली.
“राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राहुल बोलाज म्हणाले की, शिवप्रतिष्ठान ही गुरूजींची संघटना आहे. राज्यभरात असंख्य धारकरी आहेत. राजकीय हेतूने अनेकांनी गुरूजींच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी रुग्णालयात येणे टाळले. मात्र, आमदार लांडगे आवर्जुन सांगलीला आले. गेल्या १२-१३ वर्षांपासून गुरूजी आणि आमदार लांडगे यांचे कौटुंबिक नाते आहे. सांगली-कोल्हापूरला आल्यानंतर लांडगे निश्चितपणे गुरूजींच्या भेटीला येत असतात. तसेच, गुरूजी पुण्यात गेल्यानंतर लांडगे यांना संपर्क करतात किंवा अनेकदा घरीही भेट देतात. आमदार लांडगे यांची गुरूजींप्रती आत्मियता आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय भिडे गुरुजी यांच्यावर सांगलीमधील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. रुग्णालयात आज गुरुजींची भेट घेतली व संबंधित डॉक्टरांच्या टीम सोबत चर्चा केली. लवकरच गुरूजी आपले कार्य पूर्ववत सुरू ठेवतील, असा विश्वास आहे.
Read also:
- मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?
- शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग; राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता
- राज ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू
- भाजपाला मोठा धक्का; “संभाजीराजेंचं काँग्रेसमध्ये स्वागत”; सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
- ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा’, अबू आझमींचं राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र
- फडणवीसांना अक्कल दाड, राणे संपलेलं दुकान, तर ओवेसी देश विघातक; विनायक राऊतांची जोरदार फटकेबाजी