मुंबई – राज्यात सध्या राज ठाकरेंच्या अटकेच्या शक्यतेने जोर धरला आहे. कारण रविवारी झालेल्या सभेत तब्बल बारा अटी मोडल्याप्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर राज्यभरात मनसे पदाधिकाऱ्यांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली. त्यावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रया देताना राज राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
“बाबरी कुणी पाडली?” राऊतांकडून थेट अडवाणींचा ‘तो’ व्हिडिओ ट्विट, अन् फडणवीसांना म्हणाले, “आता बोला..
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली होती. त्यानंतर आता नवनीत राणा आणि रवी राणा हेही अटकेत आहेत. आणि आता राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची श्यक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांनी ‘ट्रिपल आर’ची उपमा दिली आहे.
फडणवीसांना अक्कल दाड, राणे संपलेलं दुकान, तर ओवेसी देश विघातक; विनायक राऊतांची जोरदार फटकेबाजी
तसेच पोलिसांनी नियम प्रमाणे नोटीसा दिल्या होत्या. पोलिसांनी भाषण तपासलंय. त्यातून त्यांनी अतिशय अग्रेसिव्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस कायद्याप्रमाणे काम करत आहेत. याचा शेवटी न्याय पालिका विचार करणार आहे. हे सगळं रुटीन आहे. नोटीस येणार याबाबत त्यांची देखील मानसिक तयारी आहे. असेही भुजबळ म्हणाले. तसेच केंदीय मंत्री राणे याना देखील अटक झाली होती. त्यांनतर राणा यांनादेखील अटक झाली. कोर्टाने देखील राणा दांपत्याला फटकारले. कायदे बनवणारे असे कस करू शकतात असे न्यायालयाने देखील म्हटलं आहे. राज राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट आहे. अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
तसेच असे भाषण करताना कारवाई होणारच याची तयारी असतेच आणि आंदोलन करण्यावर ठाम असाल तर पोलीस आपलं काम करतील. असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.
Read also:
- “राऊतांचा जीव केवढा आणि ते बोलतात किती”; दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- “मनसेला मिळणारा प्रतिसाद पाहून गुन्हा दाखल, सुडापोटी सरकारकडून कारवाई”; दरेकरांची प्रतिक्रिया
- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर; भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली भेट
- मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?
- शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग; राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता
- राज ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू