मुंबई – सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.
भाजपाला मोठा धक्का; “संभाजीराजेंचं काँग्रेसमध्ये स्वागत”; सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली.
राज ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू
राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे.
Read also:
- “..या राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार!”; संजय राऊतांचा व्हिडीओ मनसेने केला व्हायरल
- राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट; छगन भुजबळ यांची राजकीय घडामोडींवर खोचक प्रतिक्रिया
- “राऊतांचा जीव केवढा आणि ते बोलतात किती”; दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- “मनसेला मिळणारा प्रतिसाद पाहून गुन्हा दाखल, सुडापोटी सरकारकडून कारवाई”; दरेकरांची प्रतिक्रिया
- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर; भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली भेट
- मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?