मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न होत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. तर, मनसे कार्यकर्त्यांकडून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली
शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग; राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता
मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली
दरम्यान, आज पुण्यात खालकर मंदिरात आज मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचे पठन केले. या मंदिराच्या बाजुलाच मशिद असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठन होताच काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर धुळ्यातदेखील मशिदींसमोर भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत 10 ते 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?
राज ठाकरेंच्या या आवाहनानंतर ठाण्यातील चारकोप परिसरात पहाटे 5 वाजता मनसे कार्यकर्त्यांनी नमाजच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवली. तर नाशिकमध्ये नमाजच्या वेळी हनुमान चालिसा वाजवल्याप्रकरणी 7 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Read also:
- नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर; १२ दिवसांनी कोठडीतून होणार सुटका..
- “..या राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार!”; संजय राऊतांचा व्हिडीओ मनसेने केला व्हायरल
- राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट; छगन भुजबळ यांची राजकीय घडामोडींवर खोचक प्रतिक्रिया
- “राऊतांचा जीव केवढा आणि ते बोलतात किती”; दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- “मनसेला मिळणारा प्रतिसाद पाहून गुन्हा दाखल, सुडापोटी सरकारकडून कारवाई”; दरेकरांची प्रतिक्रिया
- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर; भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली भेट