डोंबिवली : येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे पिता पुत्रांनी पक्ष बांधणीसाठी शहरे पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला तर पुत्र अमित ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला आहे. पुणे नाशिक नंतर मनसेचे बड्या नेत्यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा फिक्स केला असून येत्या 1 आणि 2 ऑक्टोबर कालावधीत हा दौरा असून मनसे नेते अमित ठाकरे हे देखील येणार आहेत.
न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना जनताच धडा शिकवेल – अमित ठाकरे
मनसे नेते अमित ठाकरे उद्या आणि परवा कल्याण-डोंबिवलीत येणार असून यावेळी कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या चारी विधानसभा क्षेत्रा मधील पदाधिकारी यांच्या बैठका घेणार आहेत. या दौऱ्यावेळी अमित यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, संजय नाईक उपस्थित रहाणार आहेत. डोंबिवली मधील बैठका कुशाला हॉटेल, प्रीमियम ग्राऊंड आणि सर्वेश हॉल येथे होणार आहेत.
एरवी आढेवेढे घेणारे राज्यपाल आज ठाकरेंच्या ‘या’ निर्णयावर करणार खुशी-खुशीने सही!
तसेच कल्याण येथील बैठका पूर्व येथील शिवराम पाटील वाडी आणि कल्याण पश्चिमेला जिल्हा मध्यवर्ती शाखा येथे होणार आहे. यामध्ये विभागानुसार शाखा अध्यक्षांसोबत चर्चा होईल. पदाधिकाऱ्यांची बांधणी, प्रभागात झालेली कामे, रिक्त जागा कशा भरायच्या यावर साधारण चर्चा होईल असे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले.
Read Also :
- प्रोटोकॉलप्रमाणे चिपी विमानतळाच उद्घाटन होणार; नारायण राणेंच नाव कितव्या क्रमांकावर?
- जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही; भाजप-मनसे युतीवर पटोले सडकून टीका
- मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारची ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; भाजपाने मात्र दावा फेटाळला
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावं लागेल; मनसेचा टोला
- सेल्फी विथ खड्डे… घेणाऱ्या सुप्रियाताई आता कुठे आहेत? मुंबईतील खड्यावरून विरोधक आक्रमक