मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आजपासून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदाचा कारभार स्विकारला आहे. त्यांनी आज मंत्रालयात सत्यनारायणाची पुजा करून कारभार स्विकारला. त्यामुळे मंत्रालयात मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट देखील कऱण्यात आली होती. यातच आता उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार सोबत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेतील १८ खासदारांपैकी १२ खासदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यातच आज ठाण्यातील जवळपास ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता आमदारांसोबतच आता नगरसेवक देखील एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर आहेत.
“भाजप पदाधिकाऱ्यांचं कृत्य देशभरातील ओबीसी आरक्षणासाठी मारक”
शिवसेनेचे ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावल्यानंतर मनसेने उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडले होते. आज शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. भविष्यात किती राहतील माहीत नाही. शिल्लक सेनेला शुभेच्छा, असा देखील टोला लगावला आहे. चमत्कार बाबा संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला बहुतेक महापौर आता पक्षप्रमुख. सौ दाऊद, एक राऊत असं म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी सेनेला टोला लगावला आहे.
“आमच्यावर ही वेळ आली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?”राऊतांचा सवाल
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या 12 जुलै किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे सध्या 50 आमदार असून प्रत्येक 4 आमदारांमागे एक मंत्रीपद देण्याचा फार्म्युला ठरवण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून भाजपकडे 25 ते 27 मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महत्वाची खाती कुणाकडे जाणार? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “भाजप अन् शिवसेनेमध्ये आता लव्ह मॅरेज झालंय”; दिपक केसरकरांंचं वक्तव्य
- भास्करराव जाधवनंतर आता नितेश राणेंही शेतात राबतोय; राणेंनी बांधावरच केली न्याहारी
- उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरचा झटका..! ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक फुटले
- शिवसेनेचे अपमानीत ‘योद्धे’ घायाळ; सामान्य शिवसैनिकांसह नेत्यांमध्ये कमालीची नाराजी
- मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुलांची सजावट; सत्यनारायणाच्या पुजेनं होणार नव्या सरकारची सुरूवात