मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे सरकार जास्त वेळ टिकणार नसल्याचं वक्तव्य आता विरोधी पक्षाकडून केलं जात आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मागे शिंदे सरकार लवकरच कोसळणार असल्याचं सुचक वक्तव्य केलं होतं. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देखील यासंदर्भात इशारा दिला होता. आता याच पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी विरोधी पक्षाला प्रत्युत्तर दिलं आहे.
“भाजप पदाधिकाऱ्यांचं कृत्य देशभरातील ओबीसी आरक्षणासाठी मारक”
मातोश्रीवर केव्हा जाणार ? असा जेव्हा केसरकरांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, आता भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. हे एकप्रकारे लव्ह मॅरेज आहे. त्यांना दोघांच्या घरातील प्रमुखांनी एकमेकांशी चर्चा करावी लागणार आहे. आम्हाला परत बोलवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या प्रमुखांशी बोलावे. तसेच रिक्षावाला असं मुख्यमंत्र्यांना बोलले गेले पण रिक्षा वाल्यांसाठी स्टॅन्ड तयार करणार असं म्हणत त्यांनी त्याबाबत बोलणं टाळलं.
“आमच्यावर ही वेळ आली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?”राऊतांचा सवाल
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला आनंद आहे. ही लढाई आम्ही जिंकलोय, तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी हे सरकार काम करणार आहे. मुख्यमंत्री दालन आजपासुन सर्वासाठी खुले झालं आहे. त्याचा आम्हाला विशेष आनंद झाला आहे. असंही दिपक केसरकर म्हणाले. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर किती प्रेम आहे हे माहीत नाही, पण ते शरद पवार यांच्या खुप जवळ आहेत. पक्ष धोक्यात आहे हे समजताच आम्ही नेत्यांची मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. असं केसरकर म्हणाले.
“गुलाबराव पाटील हे आयत्या बिळात बसून नागोबा झालेले मंत्री”; विनायक राऊतांचा टोला
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार सोबत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेतील १८ खासदारांपैकी १२ खासदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यातच आज ठाण्यातील जवळपास ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता आमदारांसोबतच आता नगरसेवक देखील एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर आहेत.
Read also
- भास्करराव जाधवनंतर आता नितेश राणेंही शेतात राबतोय; राणेंनी बांधावरच केली न्याहारी
- उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरचा झटका..! ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक फुटले
- शिवसेनेचे अपमानीत ‘योद्धे’ घायाळ; सामान्य शिवसैनिकांसह नेत्यांमध्ये कमालीची नाराजी
- मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुलांची सजावट; सत्यनारायणाच्या पुजेनं होणार नव्या सरकारची सुरूवात
- “गरज वाटल्यास मी खर्च करतोय, पण त्यांच्यावर चांगला उपचार करा”; अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री