हिंगोली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मिशन ४८ शिवसंकल्प ठेवला आहे. याच उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज हिंगोलीत सभा होत आहेत. यासभेसाठी खासदार हेमंत पाटील यांनी जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. तर यापुर्वीच हेमंत पाटील यांनी आपल्या उमेदवारीवर दावा सांगितला असून शिंदेंच्या सभेमुळे पाटलांचं बळ अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…अजितदादांनी आखली मोठी रणनिती, अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार रिंगणात, आढळराव पाटलांचं काय होणार ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बाळापुर येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हेमंत पाटलांनी हिंगोली जिल्हा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते महिला आघाडी व इतर अंगीकृत संघनानांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्ह्यातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा…“तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार,” माजी मुख्यमंत्र्यांनी केला मोठा दावा
हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटलांनी मोठी तयारी सुरू करून दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटलांनी काॅंग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा मोठा पराभव केला होता. त्यावेळी पाटलांना जवळपास ५ लाख ८६ हजार इतकी मत पडली होती. तर विरोधी उमेदवार सुभाष वानखेडे यांना फक्त ३ लाख ८ हजार एवढ्या मते पडली. सध्या महाविकास आघाडीकडून अनेकांची नावे समोर येत आहेत. तर महायुती पुन्हा हेमंत पाटलांवर विश्वास दाखवणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठीच आज एकनाथ शिंदे यांची हिंगोलीत सभा होत असल्याचं समजत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राहुल नार्वेकर कोणत्या गटाच्या आमदारांचा गेम करणार? वाचा संपुर्ण यादी
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर वकिल उज्ज्वल निकम यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…मुंबईत ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार, पक्षाला बसला मोठा हादरा
हेही वाचा…राहुल नार्वेकरांच्या निकालाआधीच एकनाथ शिंदेंनी जाहीर केला निकाल, म्हणाले…
हेही वाचा…“तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार,” राजकीय हालचालींना वेग