मुंबई : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात या प्रकरणाच्या निकालाचं वाचन करणार आहेत. मागच्या महिन्यात झालेल्या ३४ याचिकांवर राहुल नार्वेकरांनी मॅरेथॉन सुनावणी घेतली आहे. ठाकरे गटातील १४ तर शिंदे गटातील १६ आमदारांचं भवितव्य आज टांगणीला लागलं आहे.
हेही वाचा…“तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार,” माजी मुख्यमंत्र्यांनी केला मोठा दावा
निकाल कायद्याला धरून असेल. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारावर हा निकाल असणार आहे. या निकालातून सगळ्यांना न्याय मिळेल. दहाव्या परिशिष्टाबाबत काही गोष्टींचा परामर्श घेणं आवश्यक होतं. त्या बाबींचाही या निकालात आढावा घेण्यात आला असेल. त्यामुळे हा निकाल म्हणजे नक्कीच बेंचमार्क ठरणार असेल. यात कोणत्याही त्रुटी असणार नाहीत. अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
तर शिवसेना अधिकृत पक्ष आम्हाला निवडणूक आयोगाने दिला आहे. धनुष्यबाण चिन्हही आम्हाला दिलंय. विधानसभेत ६७ टक्के बहुमत तर लोकसभेत ७५ टक्के बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने आम्हाला मान्यता दिलीय. काही लोक मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. म्हणजे त्यांचे आमदार अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते, तेव्हा आम्ही त्यावर काही आक्षेप घेतला का ? माझ्याकडे अध्यक्ष दिवसाच्या उजेडात आले. लपून आले नाहीत. तेही आमदार आहेत. असे शिंदेंनी म्हटले आहे.
हेही वाचा…“सुनील केदारांची आमदारकी त्यात तत्परतेने पुन्हा बहाल करावी, ” विरोधकांची मागणी
दरम्यान, आजच्या निकालाचे दुरगामी परिणाम पाहायला मिळतील. लोकशाहीत ज्या कारणासाठी दहावं परिशिष्ट आणण्यात आलं, घोडाबाजार आमदारांची पळवापळवी आणण्यासाठी ते आणलं गेलं. हा उद्देश आज सफल झालाय का ? हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा निकाल देताना विधिमंडळाचा पुर्ण आदर राखला. लोकशाहीत संकेत असतात की आधारस्तंभांनी एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करू नये. या तत्वाचा आदर राखून सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असल्याचं उज्जवल निकल यांनी सांगितले आहे.
शिंदे गटाच्या कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?
एकनाथ शिंदे , अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर,
ठाकरे गटाच्या कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार ?
सुनील राऊत, नितीन देशमुख, कैलास पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक, राहुल पाटील, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर वकिल उज्ज्वल निकम यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…मुंबईत ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार, पक्षाला बसला मोठा हादरा
हेही वाचा…राहुल नार्वेकरांच्या निकालाआधीच एकनाथ शिंदेंनी जाहीर केला निकाल, म्हणाले…
हेही वाचा…“तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार,” राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…अजितदादांनी आखली मोठी रणनिती, अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार रिंगणात, आढळराव पाटलांचं काय होणार ?