अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर आणि पती रवी राणा यांना अंबादेवी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. जवळपास २ किलोमीटर अंतर त्यांनी पायी चालत काढल्याने आता त्यांना मंदिरात प्रवेश का दिला गेला नाही याबद्दल सरकारवर टीका केली जात आहे. अमरावतीः खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याला अंबादेवी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
राणा दाम्पत्य कार्यकर्त्यांसह दोन किलोमीटर अनवाणी पायी चालत अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवीकडे पोहोचले असता त्यांना मंदिरात आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आतमध्ये दर्शनासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला.आधीच विरोधी पक्ष धार्मिक स्थळ उघडावीत म्हणून सातत्याने आंदोलन करत आहे. आता या आंदोलनाने याला आणखी बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंदिरात दैनंदिन पूजा, आरती होत असतात. नवरात्रोत्सवात दररोज शेकडो भाविकांची गर्दी राहायची. तिथं आता अपवादाने भाविक येतात. मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेत भाविक परतात. यंदा इथले महाप्रसाद, कोजागिरी उत्सव असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सगळं काही अनलॉक होत असताना मंदिर मात्र अद्यापही उघडण्यास परवानगी नाही. त्यामुळे मंदिराबाहेर दुकान लावून उदरनिर्वाह करणाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिरे कधी उघडणार, किरकोळ विक्रेत्यांना रोजगार कसा मिळणार, असे प्रश्न विचारले जात आहेत.
Read Also :
उद्याच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘या’ प्रश्नांची उत्तर देणार https://t.co/f5tEx8eeDr @OfficeofUT @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020