यवतमाळ : भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. बंडखोर आमदार संजय राठोड यांच्याविरोधात संजय देशमुख उभे राहण्याची शक्यता असून ही निवडणुक रंगतदार होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“राष्ट्रवादीविरोधात शिंदे-फडणवीसांची पुण्यात मोठी फिल्डिंग”; दोन्ही बांजूचे नेते एकवटले
माझी 80 वर्षाची आई मागील काही दिवसापासून सुरू असलेली परिस्थिती पाहत आली आहे. ज्यावेळी माझ्या आईला विचारलं की मी शिवसेनेत जाऊ का? त्यावर माझ्या आईने अतिशय मार्मिक उत्तर मला दिलं की, अशा संकटांच्या काळी ज्या पक्षामुळे तुझी ओळख झाली आहे. त्या पक्षाला आपली गरज असल्याने कोणतीही अट, शर्थ न ठेवता आपल्याला गेलं पाहिजे. मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.
“उद्धव ठाकरे राजकारणी झाले नसते तर ते वकिल किंवा डॉक्टर झाले असते”; आदित्य ठाकरे
आज यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला शिवसेनेची गरज आहे. तसेच आमदार, खासदास गेले तरी खरा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याच पाठिशी आहे. त्यामुळे यवतमाळमधून एक आमदार आणि एक खासदार गेला तरी आम्ही चार आमदार आणि एक खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. असंही ते म्हणाले.
“ठाकरेंना क्लीन बोल्ड करण्यासाठी शरद पवार अन् मोदी एकत्र येतील”; केंद्रीय मंत्र्याचं सुचक वक्तव्य
दरम्यान, संजय देशमुख यांनी 1999 ते 2009 असे दहा वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र 2009 च्या निवडणुकीत त्यांचा संजय राठोड यांनी पराभव केला. त्यामुळे संजय राठोड यांचा पराभव करण्यासाठी संजय देशमुख आता शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेचे ताकद आणखीच वाढली आहे.
Read also
- “संजय राऊतांची दिवाळीही तुरुंगातच”; न्यायालयाने आणखी वाढवली कोठडी
- “साहेब चिंता करू नका, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची राहील”
- “तर येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा दुष्काळ दिसेल”; राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर निशाणा
- “प्रत्येक जण गट स्थापन करतोय, माझा ही गट लवकरच दिसेल”; दिपाली सय्यद
- “राज ठाकरे, शिंदे अन् देवेंद्र फडणवीस एकत्र येणार”; तारिख अन् वेळ ही ठरली ?