मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी संपातून तात्पुरती माघार घेत असल्याचं जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. ‘एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्यसरकारची होती परंतु भाजपच्या लोकांनी एसटी महामंडळाला विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केलं’, असा आरोप मलिक यांनी केला.
एसटीच्या विलीनीकरणावर शरद पवारांचे मोठं विधान; म्हणाले…
‘विलिनीकरणाचा निर्णय सरकारने घेतला असता तर या राज्यामधील नगरपालिका आणि इतर महामंडळे आहेत. त्यातील सर्व कर्मचारी आम्हाला सरकारी कर्मचारी घोषित करा, सातवा वेतन आयोग लागू करा ही मागणी घेऊन पुढे आले असते. या राज्यातील उत्पन्नाचे स्रोत आहेत त्याचा विचार करुन या मागण्या मान्य केल्यानंतर सरकार कर्ज काढूनही त्यांना पगार देऊ शकले नसते. ही सत्य परिस्थिती आहे’, अशी भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.
‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
महामंडळ व्यवस्थित चालले पाहिजे, वेळेवर पगार दिला पाहिजे, पगारवाढ झाली पाहिजे, बोनस वेळेवर मिळाला पाहिजे, अशी सरकारची भूमिका पहिल्यापासून आहे. परंतु भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करून भडकवत आहेत असाही आरोप मलिक यांनी केला. हळूहळू एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आणि काल सरकारच्या माध्यमातून पगार वाढ आणि वेळेवर पगार व बोनस मिळतील याची घोषणा झाली. कामगार कामावर परतायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना कळून चुकले आहे की, आपली दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे त्यांनी माघार घेतली, असं मलिकांनी सांगितले.
Read Also :
- प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय? संजय राऊतांचा सदावर्तेंना रोखठोक सवाल
- आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; हिंगोलीतील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘तुटेपर्यंत ताणू नका, एकदा तुटलं तर जोडणार नाही’; अनिल परब यांचा इशारा
- स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला झटका; राष्ट्रवादीने उचललं मोठं पाऊल..
- ‘देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू झालो’; सचिन वाझेंचा खळबळजनक जबाब