मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्याकाही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सरकार सगळे झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य झोपेत असताना केलं की जागं असताना केलं, असा टोला लगावला होता. या शाब्दिक वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे.
चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील 15 वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असेल, अशी जोरदार टीका अमोल मिटकरी यांनी केली.
अजितदादा सांभाळून बोला! कसं आहे, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल, असे वक्तव्य देखील चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावरून देखील मिटकरींनी चंद्रकांतदादांवर शाब्दिक हल्ला चढवला.
औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात. फाटलेलं शिवलं पाहिजे असं म्हणतात. तुम्ही फाटलेल्या तोंडाचे आहात हे स्वतः कबूल केलंय. इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी जास्त फाटू नये याची काळजी घ्या, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
Read Also :
- ‘मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी’
- ‘सत्तेसाठी आधी हिंदुत्व सोडले आणि आता बाळासाहेबांचे विचारही!’
- ‘चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये’ – हसन मुश्रीफ
- ‘नव्या भारताचा पाया’ : एकीकडे पुलवामातील शहिदांचा राजकीय वापर; दुसरीकडे गंगेत वाहणारी प्रेतं आणि चितांचा धूर
- ‘निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीचं प्रेम इतकं का ऊतू जात आहे?’