पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपासून खुप मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर राज्यात बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी एकनाथ शिंदे यांना पुर्वीपासुनच मुख्यमंत्री व्हावे वाटत होते, असा टोला लगावला आहे.
“राऊतांना राष्ट्रवादीत जायचं आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेना फोडली”; रामदास आठवलेंचं वक्तव्य
यावेळी खडसे म्हणाले की, मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे. तर 30 वर्ष विधिमंडळात काम करतोय. यासारखी परिस्थिती या आधी कधीही पाहिली नाही. शरद पवार हे काँग्रेसमधुन बाहेर पडत वेगळे झाले पण त्यावेळी कायदा वेगळा होता. म्हणजे त्या काळामध्ये फुटीला मान्यता होती. नंतर कायद्यात बदल झाला. आता कायद्याने एका पक्षातून बाहेर पडताच कोणत्याही दुसऱ्या पक्षात जावे लागते, असा कायदा सांगतो, असे एकनाथ खडसे म्हणाले.
मी आज मुख्यमंत्री नसलो तरी…; OBC आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
पुर्वीपासुनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हावं अस वाटत होतं. त्यांची शिवसेनेकडूनच मुख्यमंत्री व्हावी अशी इच्छा होती. शिवसेनेतुन होता आलं नाही म्हणुन त्यांनी भाजपशी जवळीक केली. पण कायद्याने उद्धव ठाकरेंकडेच शिवसेनेचे पुर्ण अधिकार आहेत. जर शिंदे म्हणत आहेत सेनेत आहोत तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. आरिजनल शिवसेना कोणाची आहे हा विवाद निर्माण करण्यासाठी ते शिवसेनेत आहेत असे म्हणत आहेत. मुळात त्यांना पक्षांतर बंदी विधेयक कायदयापासून वाचण्यासाठी सुट पाहिजे आहे. जर ते शिवसेनेपासून वेगळे झाले तर ते अपात्र ठरतील, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? आज ठरणार देशाचा 15 वा राष्ट्रपती कोण? वाचा सविस्तर
ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाल्यानंतर हे आरक्षण महाविकास आघाडीमुळेच मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या काळातच या प्रकरणांचा सर्व डाटा हा कोर्टाला दिला गेला. महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोर्टाकडे वारंवार पाठपुरावठा केला यामुळेच हे आरक्षण मिळालं आहे असं एकनाथ खडसे म्हणाले.
Read also
- “3 सदस्यांची प्रभाग रचना रद्द करून 4 सदस्यांची प्रभाग रचना करावी”; भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “जर झगडे या आयोगात नसते तर यांनी ओबीसींची कत्तल केली असती”
- “बावनकुळे साहेब…आपण स्वप्नात राहू नका”; अमोल मिटकरींचा बावनकुळेंना टोला
- “फडणवीस हे बालिशच आहेत, सत्तेसाठी आसुरलेले नेते”; राष्ट्रवादीचा फडणवीसांवर हल्लाबोल
- भाजपच्या 4 आमदारांची आर्थिक फसवणुक करणारा पोलिसांच्या ताब्यात