IMPIMP

‘पक्षात पार्थ पवार यांना डावललं जात आहे’; रोहित पवार म्हणाले…

मुंबई – ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजितदादांचं शीतयुद्ध आहे, तसेच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना डावललं जात असून रोहित पवारांना बळ दिलं जात आहे. असे नमूद करण्यात आले आहे. तर, पवार कुटुंबात वाद असे नाहीत. पण पक्षावरील कमांड कुणाची राहावी या मुद्द्यावरून पवार कुटुंबात सारं काही अलबेलही नाही असेही ‘पॉवर ट्रेडिंग’ पुस्तकात लिहिले आहे. शिवाय पार्थ पवारांना ज्या पद्धतीने पाठबळ मिळायला हवं होतं. तसं मिळालेलं नाही, असं ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकाच्या लेखिका प्रियम गांधी यांनी सांगितलं. या दाव्यावरुन आता रोहित पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले की, पुस्तक कुठलही असलं तरी ते लिहिणाऱ्याच्या डोक्यानं लिहिलं जातं. माझ्यासाठी नातं महत्त्वाचं आहे. हे नातं त्या लिहिणाऱ्यापेक्षा मोठं असल्याचं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलं आहे. सोलापूरमधील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.

कोणतंही पुस्तक हे लेखकाच्या डोक्याने लिहिलं जातं. आज कोणत्या समस्या आहेत याबाबत वाचण्यात माझा जास्त वेळ जातो. त्यामुळे हे जे काही पुस्तक आलेलं आहे. मी केवळ त्याचा कव्हर पेज पाहिलं आहे. आतमध्ये काय लिहिलं आहे याबाबत मला माहिती नाही. पुस्तकात आणखी काही गोष्टी लिहिल्याचं कळलं. त्यांना ही माहिती कुठून मिळाली हे पुस्तक लिहणाऱ्या व्यक्तीलाच विचारावं लागेल, असं रोहित पवारांनी यावेळी सांगितले.

तसेच, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढू लागली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या एका नेत्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी या नेत्याने अजित पवार तुमच्यासोबत सत्ता स्थापन करू शकतात. त्यांचा शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध आहे, असं फडणवीसांना सांगितलं. त्यासाठी या नेत्याने शिवसेनेसोबत जाण्यास अजितदादा इच्छूक नाहीत, सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजितदादांचं शीतयुद्ध आहे, तसेच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना डावललं जात असून रोहित पवारांना बळ दिलं जात आहे. त्यामुळेही अजितदादा नाराज असल्याचं या नेत्याने फडणवीस यांना सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांचा पक्षातून डावललं जात असल्याची चित्रे अनेक वेळा समोर आली आहेत. तसेच त्यांनी पक्षाविरोधात भुमिका देखील घेतल्या होत्या. यावरून आजोबा आणि नातवामध्ये वाद देखील झाले होते. त्यामुळे ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात नमूद केलेले मुद्दे हे खरे असल्याची श्यक्य देखील वर्तविली जात आहे.