मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणात आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आज सकाळी ६ वाजता छापा टाकलला असून, प्रदीप शर्मांना देखील लोणावळ्यातून ताब्यात घेतले गेले आहे. प्रदीप शर्मांचा या दोन्ही प्रकरणात संबंध असावा, असा संशय एनआयएकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना आता अखेर एनआयएकडून अटक करण्यात आली असून, त्यांना आज विशेष सेशन कोर्टात हजर करण्याची शक्यता देखील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तब्ब्ल सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून, दुसऱ्या एका पथकाने त्यांच्या मुंबईमधील घरातूनमधून काही महत्वाची कागदपत्रं देखील छाप्यामध्ये सोबत घेतल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
प्रदीप शर्मा यांची याआधीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून, त्या अनुषंगाने आज सकाळी हा छापा टाकण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या अंधेरीतील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलांसोबत, सीआरपीएफच्या १० ते १२ गाडयादेखील घटनास्थळी उभ्या होत्या.
याआधी, ७ एप्रिलला देखील तब्ब्ल ८ तास त्यांची चौकशी केल्यानंतर, ८ एप्रिलला शर्मांना पुन्हा एनआयएने चौकशीसाठी बोलावलं होतं. तसेच, यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे आणि शर्मा यांना समोर आणून एनआयएने दोघांची चौकशी केली होती. २ दिवसांपूर्वीच एनआयएनं शर्मा यांच्या २ निकटवर्तीयांना, बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना, ॲंटिलिया स्फोटकं आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख
मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी
113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे
शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव
1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते
लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती
2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले
प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू आलं
2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती
Read Also :
- अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी
- “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
- “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
- ‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’ संजय राऊत यांनी दिला भाजपला थेट इशारा
- केंद्रानं इंपेरिकल डाटा द्यावा, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार- छगन भुजबळ