मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणात आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आज सकाळी ६ वाजता छापा टाकलला असून, प्रदीप शर्मांना देखील लोणावळ्यातून ताब्यात घेतले गेले आहे. प्रदीप शर्मांचा या दोन्ही प्रकरणात संबंध असावा, असा संशय एनआयएकडून व्यक्त होत आहे. प्रदीप शर्मा यांची याआधीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून, त्या अनुषंगाने आज सकाळी हा छापा टाकण्यात आला आहे.
हे पण वाचा, अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी
या कारवाईसाठी प्रदीप शर्मांच्या अंधेरीतील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलांनाही तैनात करण्यात आलं आहे, सोबतच सीआरपीएफच्या १० ते १२ गाडयादेखील घटनास्थळी आहेत. यातच आता प्रदीप शर्मांना अटक केली जाण्याची देखील शक्यता बोलून दाखवली जात आहे.
हे पण वाचा,
याआधी, ७ एप्रिलला तब्ब्ल ८ तास चौकशी केल्यानंतर, ८ एप्रिलला शर्मांना पुन्हा एनआयएने चौकशीसाठी बोलावलं होतं. तसेच, यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे आणि शर्मा यांना समोर आणून एनआयएने दोघांची चौकशी केली होती. एनआयएने यावेळी काही महत्वाची कागदपत्रं देखील या छाप्यामध्ये त्यांच्यासोबत घेतल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
Mumbai: NIA conducts raid at the residence of Shiv Sena leader and former 'encounter specialist' of Mumbai Police, Pradeep Sharma. Details awaited.#Maharashtra pic.twitter.com/s6dO1WMh6T
— ANI (@ANI) June 17, 2021
प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे एकमेकांच्या संपर्कात असून, या कटाविषयी शर्मा यांना माहिती असावी, असा संशय तपाय यंत्रणेला आहे. तसेच, २ दिवसांपूर्वीच एनआयएनं शर्मा यांच्या २ निकटवर्तीयांना, बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना, ॲंटिलिया स्फोटकं आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख
मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी
113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे
शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव
1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते
लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती
2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले
प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू आलं
2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती
Read Also :
- उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय
- “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
- “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
- ‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’ संजय राऊत यांनी दिला भाजपला थेट इशारा
- केंद्रानं इंपेरिकल डाटा द्यावा, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार- छगन भुजबळ