मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने काल दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. मात्र, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच, भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने, सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला.
हे पण वाचा, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने भिडले; सेना भवनासमोर तुफान राडा
दरम्यान, याचे तीव्र पडसाद अजूनही उमटत असून, यात आता शिवसेना आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, ‘शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणात नाही. कुठलातरी एक टोळका आला होता. त्याने शिवसेना भावनांवर चाल केली. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात. पण शिवसेना भवन ही बाळासाहेबांची वास्तू आहे. त्याच्यावर जर तुम्ही चाल करणार असाल, तर शिवसैनिक आणि मराठी माणूस शांत बसेल का?, आत्ता शिवप्रसाद दिला आहे, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका,’ असा सज्जड दम त्यांनी भाजपला दिला आहे.
Mumbai: Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) workers protested outside Shiv Sena Bhavan, in Dadar, today over allegations of land scam regarding Ayodhya Ram Temple construction. A scuffle broke out b/w Shiv Sena & BJYM workers during protest.
At least 40 BJYM workers detained. pic.twitter.com/2vju6sUaL6
— ANI (@ANI) June 16, 2021
“मुळात असे कृत्य करण्यामागे कारण काय? आम्ही सामानातून काही राम मंदिरासंबंधी आरोप केले, असं जर तुमचं म्हणणं असेल, तर तुम्हाला लिहिता-वाचता येतं का? तुम्हाला शिक्षणाचा काही गंध आहे का? एकदा सामनामध्ये काय लिहिलं आहे, ते नीट वाचा. जे आरोप झाले आहेत, त्यांची चौकशी व्हावी आणि ते आरोप द्वेषबुद्धीने केले असतील, तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका, असं अग्रलेखात स्पष्ट म्हटलं आहे. यावर एखाद्याला एवढ्या मिरच्या का झोंबाव्यात? यात भाजपावर कुठेही थेट आरोप नाही. आम्ही भाजपने घोटाळा केला, असं देखील म्हटलं नाही,” असे सवाल संजय राऊत यांनी भाजपला केले आहेत.
Read Also :
- “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
- “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
- लपून-छपून हल्ला करून शिवसेनेने आपली ‘औरंगजेबी’ वृत्ती दाखवली
- राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटाच
- महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार?