मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली. मात्र, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.
हे पण वाचा : ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
भाजप युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून युवा मोर्चाने आंदोलन पुकारले होते. भाजपच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवना समोर जमले. जशास तसे उत्तर देण्याच्या इराद्यानेच शिवसैनिक सेना भवनासमोर जमले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात मोठी धुमश्चक्री उडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे सेना भवनासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सेना भवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवांनाही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
हे पण वाचा : राम मंदिर ट्रस्ट घोटाळा : सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत
दरम्यान, मोर्चा संपला असं वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली. आम्ही गाडी करून चाललो असताना शिवसैनिकांनी आम्हाला मारलं असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
Read Also :
- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत; आपण त्यांना पाहिलतं का?
- ‘‘ज्यांच्या काळात ५८ कोटींचा घोटाळा झाला, साखरेचे पोते असणारे ट्रक चोरले गेले…’’ इंद्रजित मोहितेंची पुन्हा एकदा अविनाश मोहितेंवर टीका
- केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल; तब्बल २३ जणांच्या समावेशाची शक्यता!
- राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन ५ जुलैला होणार
- भाजप-काँग्रेसमध्ये वाद; बोलू दिले जात नसल्याच्या आरोपावरुन आमदारांमध्ये वादावादी