मुंबई : राममंदिरासाठी जमीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे भाव काही मिनिटात कोट्यावधी रुपयांनी वाढवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यावरून आता शिवसेने पाठोपाठ काँग्रेसने देखील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
राममंदिरासाठी 2 कोटी रूपयांनी खरेदी केलेली जमीन काही मिनिटातच 18.5 कोटी रूपयांमध्ये पुन्हा खरेदी केली गेली, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेतेतेजनारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही मंदिराच्या नावाखाली विकत घेतल्या जाणाऱ्या जमिनीत घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे.
मैंने पहले ही कहां था।
राम मंदिर के नाम से चंदा यह भाजपा और आरएसएस का धंधा है।
धंधा तो करना था , करेंगे ही। https://t.co/6tcypqz3tO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 15, 2021
आता यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा आहे. धंदा करायचाच होता व ते करणारच’, अशी टीका सावंत यांनी केली आहे.
जे श्रीरामाचा उपयोग राजकारणासाठी करतात, त्यांनी श्रीरामाचा उपयोग पैशांसाठी करणे आश्चर्याची गोष्ट नाही. हे लोक प्रभू श्रीरामाच्या विचारांच्या विरोधात आहे. श्रीरामाने प्रेम, करुणा आणि त्यागाचा आदर्श समोर ठेवला. निर्बलाच्या रक्षणासाठी शस्त्र उचलले. हे तर रामाच्या नावाने निर्बलावर वार करत आहे, अशी बोचरी टीका सावंत यांनी भाजपवर केली आहे.
Read Also :
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’
- ‘मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा’
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?
- ‘काँग्रेस हाच भाजपाला पर्याय, गावखेड्यात पक्षाचा विचार पोहचवा’; पटोलेंचा कार्यकर्त्यांना आदेश