मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने काल दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली. मात्र, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.
हे पण वाचा, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने भिडले; सेना भवनासमोर तुफान राडा
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर सडकून टीका केलीये.
हे पण वाचा, लपून-छपून हल्ला करून शिवसेनेने आपली ‘औरंगजेबी’ वृत्ती दाखवली
“आंदोलन संपले..पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केली त्यानंतर लपत छपत येतं महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थं श्री शिवाजीमहाराजांचं नावघेतां…सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा महाराष्टाच्या पुरोगामी सरकारला हा हल्ला मंजूर आहे का? या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध,” असा थेट सवाल त्यांनी शिवसेनेला आणि अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना केला आहे.
आंदोलन संपले..पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केली त्यानंतर लपत छपत येतं महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थं
श्री शिवाजीमहाराजांचं नावघेतां…सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा
महाराष्टाच्या पुरोगामी सरकारला हा हल्ला मंजूर आहे का?
या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध https://t.co/0CocvlWaIj— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 16, 2021
दरम्यान, भाजपकडून शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना अचानक काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
Read Also :
- “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
- राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटाच
- महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार?
- “चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!,” ठाकरे सरकारची ही कसली बनवाबनवी?
- मराठा आरक्षण मूक आंदोलन : “सर्वांचा पाठिंबा आणि कुणाचाही विरोध नाही, तर हा पेच सुटत का नाही?”