नागपूर : गेले काही महिने शांत असलेले अनिल देशमुख प्रकरण, आता पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे. १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा कायम असून, आज या प्रकरणाच्या संबंधी आणखी काही महत्वाची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा, राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटाच
मुंबईहून ईडीचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले होते. यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी ३ जणांची नागपूरात मध्यरात्री पर्यंत गुप्त चौकशी केल्याची माहिती असून, कोळसा व्यावसायिक धरमपाल अग्रवाल, सीए सुधीर बाहेती आणि सीए भाविक पंजवाणी या तिघांचा यात समावेश आहे. या तिघांकडूनही ईडीच्या पथकांनी काही महत्वपूर्ण कागदपत्रे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे पण वाचा, “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
याआधी देखील ईडीने या प्रकरणी १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात २५ मे रोजी सागर भटेवार, समित आयझॅक व जोहर कादरी या देशमुखांच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी केली होती. यामध्ये, गेल्या काही दिवसांपासून भटेवार हे देशमुखांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आल्याने, ईडीने भटेवार यांच्यावर घरावर छापा टाकला होता. यात सागर भटेवार हे अनिल देशमुख यांचे व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली.
Read Also :
- ‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’ संजय राऊत यांनी दिला भाजपला थेट इशारा
- “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
- लपून-छपून हल्ला करून शिवसेनेने आपली ‘औरंगजेबी’ वृत्ती दाखवली
- महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार?
- उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय