मुंबई : नितेश राणेंनी एका व्यक्तीला 12 कोटींचां गंडा घातला असून, यामुळे त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर केला होता. तसेच, राणे मेडिकल कॉलेजला परवानगी मिळावी म्हणून रोज मातोश्रीवर फोन करायचे, असा दावा देखील त्यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता भाजप नेते निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.
मेडिकल कॉलेजची परवानगी दिल्लीतून येते मातोश्रीतून नाही हे देखील या अडानी खासदाराला माहित नाही, असे म्हणत निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे.
आम्ही सत्तेत असताना श्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे विषय घेऊन किती वेळा राणे साहेबांना भेटले हे पण एकदा त्यांनी स्पष्ट करावं. स्व.बाळासाहेब हयातीत असताना राणे साहेबांना फोन करायचे. मेडिकल कॉलेजची परवानगी दिल्लीतून येते मातोश्रीतून नाही हेदेखील या अडानी खासदाराला माहित नाही.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) January 11, 2021
आम्ही सत्तेत असताना एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे विषय घेऊन किती वेळा राणे साहेबांना भेटले हे पण एकदा त्यांनी स्पष्ट करावे. स्व.बाळासाहेब हयातीत असताना राणे साहेबांना फोन करायचे, असा दावा निलेश राणेंनी ट्विट करत केला आहे.
विन्या राऊत मीटर चोर तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणेंचं काहीही बिघडू शकत नाही. तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही. बेवडा मुलगा निस्तरता येत नाही म्हणून दुसऱ्याना बोलून काही बदलणार नाही. जनतेने काम करायला निवडून दिले आहे, राणेंवर टीका करायला नाही.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) January 11, 2021
विनायक राऊत मीटर चोर तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणेंचं काहीही बिघडू शकत नाही. तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही. बेवडा मुलगा निस्तरता येत नाही म्हणून दुसऱ्याना बोलून काही बदलणार नाही. जनतेने काम करायला निवडून दिले आहे, राणेंवर टीका करायला नाही, असे जोरदार टीकास्त्र राणेंनी सोडले आहे.
Read Also :
- आरक्षणाविषयी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, अशोक चव्हाणांची माहिती
- बर्ड फ्लूसंदर्भात गैरसमज व अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा मृत्यू
- … त्यावेळी फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, विनायक राऊतांचा दावा
- … नाहीतर शिवसेनेने काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली पाहिजे – आशिष शेलार