नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला असून, या अपघातात त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांना गंभीर दुखापत झाली आहे. कर्नाटकमधील अंकोला तालुक्यात हिल्लूर-होसकांबी गावाजवळ हा अपघात झाला.
श्रीपाद नाईक हे केंद्रीय आयुष मंत्री आहेत. या अपघातमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा देखील मृत्यू झाला आहे.
Prime Minister Narendra Modi has spoken to Goa Chief Minister Pramod Sawant to ensure proper arrangements for the treatment of Union Minister Shripad Naik, at Goa. https://t.co/txAQZm0Lz6
— ANI (@ANI) January 11, 2021
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. नाईक आणि त्यांच्या कुटुंबातील चार जणांनी येळ्ळापूर येथे सकाळी गंटे गणपतीचे दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर हे सर्वजण गोकर्णकडे रवाना झाले. राष्ट्रीय महामार्ग-63 वरून त्यांच्या गाडीने छोटय़ा रस्त्यावर वळण घेतले. मात्र तो रस्ता अतिशय खराब होता त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पलटली.
सध्या श्रीपाद नाईक यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच नाईक यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पंतप्रधान मोदींनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
Read Also :
- … त्यावेळी फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, विनायक राऊतांचा दावा
- … नाहीतर शिवसेनेने काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली पाहिजे – आशिष शेलार
- मोशीतील कचरा डेपो ‘बायोमायनिंग’च्या निविदा प्रक्रियेत राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेते इच्छूक
- ‘माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्य सरकार जबाबदार’
- मला काहीही तक्रार नाही, मी विना सुरक्षेचा देखील फिरत राहणार – फडणवीस