पिंपरी : गेली अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमधील कचरा मोशी डेपो येथे टाकल्याने, तेथे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. या कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार असून, यासंदर्भात निविदा प्रसिद्ध झाली आहे.
ही निविदा आपल्याच जवळच्या कंपनीला मिळावी यासाठी आता राजकीय हस्तक्षेप सुरू झाला आहे. यासाठी राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रयत्न करत असल्याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी देखील वैतागले आहेत.
महापालिकेने या कामासाठी 30 महिन्यांच्या कालावधीत 42 कोटी 95 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. मात्र राजकीय नेत्यांकडून ही रक्कम वाढवण्याचा अग्रह धरला जात असल्याचे सांगितले जात आहे.
या निविदा प्रक्रियेद्वारे महापालिका प्रशासनाच्या वतीने मोशी कचरा डेपो येथील पूर्वीच्या साचलेल्या कचऱ्याचे डोंगर नष्ट करुन जागा रिकामी करणे यासाठी बायोमायनिंग प्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र, सत्ताधारी-विरोधी पक्षांच्या राजकीय पक्षामुळे आता ही निविदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे चित्र आहे.
Read Also :
- ‘माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्य सरकार जबाबदार’
- मला काहीही तक्रार नाही, मी विना सुरक्षेचा देखील फिरत राहणार – फडणवीस
- ‘हा बेशरमपणाचा कळस’, भंडारा दुर्घटनेनंतर सामनातून केंद्र-भाजपवर निशाणा
- ‘सरकारचे आभार! आता राज्य सरकारने हीच सुरक्षा महिलांना द्यावी’
- ‘सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता त्यांना टोपी काढू देणार नाही’