अभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार कि सीबीआय या चर्चांना पूर्णविराम देत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहे. यापार्शवभूमीवर विरोधी पक्षांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. यातच भाजप नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी केली आहे .
‘राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा मागितला पाहिजे. आंधळा आणि भैरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसात कोण दबाव टाकत होतं. एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं म्हणून राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे;, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1296081310826426368?s=20
सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी सीबीयाकडून नेमण्यात आलेली टीम लवकरच मुंबई पोलिसांच्या नोडल ऑफिसरकडून यासंदर्भातील सर्व कागदपत्र, रिपोर्ट तसंच मोबाईल यांची माहिती घेतील.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी यामध्ये सीबीआयला संपूर्णपणे सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.