मुंबई : शिवसेना भवनातून अनेक कलाकारांना फोन जातात आणि त्या सर्वांना सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी ट्विट करायला सांगितले जाते, असा गंभीर आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाउंट्स हाताळण्यासाठी तब्बल 6 कोटी रुपये एका वर्षासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होती. टीकेनंतर यासंदर्भात निर्णय मागे घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
नितेश राणे म्हणाले की, ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. टिव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे मांडून सर्वांना उघडं पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिलं झालेत, हे सर्व मला माहिती आहे. सेलिब्रेटींनी थेट सेनाभवनातून फोन केले जातात छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते, असे ते म्हणाले.
Read Also :
- मराठा आरक्षण : ‘तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार’
- मराठा आरक्षणावर केंद्राची पुनर्विचार याचिका, अशोक चव्हाण म्हणाले…
- मराठा आरक्षण प्रकरणावर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल
- ग्लोबल टेंडरचा “घास” दाखवून, ठाकरे सरकारचा “फार्स” सुरु आहे
- “मोदीजी…हे सगळं आता थांबवा”, देशभरातल्या नेत्यांचे मोदींना पत्र