मुंबई : महामारीचा फैलाव कमी करण्यासाठी आणि लसीकरणाची गति वाढवण्यासाठी राज्य सरकार सोबतच मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पाऊलटाकले असून, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, “लसींसाठी (ग्लोबल टेंडर) जागतिक निविदा काढणारी मुंबई महापालिका जगात पहिली ठरली आहे. असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, यावरून विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले असून, भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, ‘महाविकास आघाडी सरकार ग्लोबल टेंडरकरता केंद्राकडे परवानगी मागते आहे आणि त्याचवेळी महापालिकेला स्वतः मंजुरी देतेय? यांचं गौडबंगाल काही कळत नाही! जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
आज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी, “लसींसाठी (ग्लोबल टेंडर) जागतिक निविदा काढणारी मुंबई महापालिका जगात पहिली ठरली आहे. याची अंतिम तारीख ही १८ मे असून, आदेश निघाल्यानांतर संबंधित कंपन्यांना कमीत कमी ३ आठवड्यांच्या आत लस द्याव्या लागतील. त्यांना आयसीएमआर आणि डीसीजीआयची मार्गदर्शक तत्वे देखील पाळावी लागतील”, असं नमूद केलं.
तसेच, आवश्यक असल्यास कंपन्यांनी त्यांचे शीतगृह स्थापान करावे. मात्र, लसींची कार्यक्षमता आमच्या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये दिल्यानुसार ६०% पेक्षा कमी नसावी. या सर्व प्रक्रियेसाठी कोणालाही आगाऊ देय मिळणार नाही. वेळेवर लस देण्यात न आल्यास आम्ही कंपन्यांना दंड करू,” असं देखील त्या एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.
Read Also :
- “मोदीजी…हे सगळं आता थांबवा”, देशभरातल्या नेत्यांचे मोदींना पत्र
- ठाकरे सरकारने दिली कोर्टाला हमी, परमबीर सिंग यांना तूर्तास अटक नाही
- करोना लसींसाठी जागतिक निविदा मागवणारी आमची पहिली महानगरपालिका – किशोरी पेडणेकर
- उद्धव ठाकरे मुंबईचेच मुख्यमंत्री का?; उपदेशाचे डोस देणारे शरद पवार कुठे आहेत!
- मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केवळ PR महत्वाचा, राज्यातल्या जनतेचा जीव मात्र कवडीमोल