मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातून मारहाण झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केला होता. तसेच नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर लगेच शिंदे यांच्या गटातून उत्तर देण्यात आलं आहे. नितीन देशमुख यांना शिंदे गटातून नागपुर विमान तळावर सोडल्याचा व्हिडीओ जारी केला आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या बंडांचा रविवारी शपथविधी होणार ?
एकनाथ शिंदे यांच्या गटातून मला मारहाण, तसेच अंगावर इंजेक्शन दिला असा आरोप केला होता. तसेच जवळपास ४ किलोमीटर त्यांच्या गटातून पळून आलो असल्याचं वक्तव्य नितीन देशमुख यांनी केलं आहे. त्यानंतर लगेचच शिंदे यांच्या गटातून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. त्यात शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जेवण,तसेच नागपुरच्या विमानतळावर सोडल्याचं म्हटलं आहे.
भाजपची अट, बंडखोर शिंदेगट भाजपमध्ये विलीन झाला तरच सरकार स्थापन; प्रकाश आंबेडकरांचं ट्विट
नितीन देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर काल एकनाथ शिंदे यांनी देखील वक्तव्य केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, नितीन देशमुख यांना माझ्या दोन कार्यकर्त्यांना सोडण्यास लावले होते. त्यानंतर नितीन देशमुख सुरक्षितपणे महाराष्ट्रात पोहचल्याचे फोटो शिंदे गटातील नेत्यांनी जारी केले आहेत. त्यामुळे आता नितीन देशमुख हे तोंडावर पडले आहे.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवा; पवारांचा ठाकरेंना सल्ला, शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, एकनाथ शिंदे गटात आता कृषी मंत्री दादा भुसे देखील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. तसेच शिवसेनेचा ठाण्या वाघ म्हणजे गुलाबराव पाटील देखील शिंदे गटात सामील झाले आहे. त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी पत्रकार परिषेद घेऊन बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच येत्या २४ तासात परत आल्यावर महाविकास आघाडीतून बाहेर पडू असंही ते म्हणाले.
Read also:
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
- शिंदे गटाचा आता थेट धनुष्यबाणावरच दावा; शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात
- शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री अन् केंद्रात 2 मंत्रीपद