नागपूर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोळीबार चौक ते कडबी चौक उड्डाणपुलाचे भूमिपूजन आणि पुलापलीकडील नागरिकांसाठी दोन हजार कोटी रुपये देण्याची घोषणा करून मास्टर स्ट्रोक लावला आहे. दुसरीकडे राज्यात सत्तेत असतानाही मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा करता येत नसल्याने महाविकास आघाडीचे नेते हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
हे पण वाचा: लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का?, भाजपचा खोचक सवाल
महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शहरात भूमिपूजन आणि आंदोलनाचा धडाका वाढला आहे. रोज प्रत्येक प्रभागात सत्ताधाऱ्यांमार्फत भूमिपूजन आपली कार्यक्षमता दाखवली जात आहे, तर दुसरीकडे विरोधकांचे आंदोलने वाढली आहेत. राज्यात सत्तेत नसतानाही गडकरी कोट्यवधींच्या घोषणा करीत आहेत. विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसची विस्तार मोहीम थंडावली आहे. शिवसेनेत उत्साह असला तरी गटबाजी कायम आहे. कोणी कोणाचे ऐकायला तयार नाही. बसपाच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रमात एकदम वाढ झाली आहे. काही छोट्या छोट्या पक्षांनी आम्ही महापालिकेच्या सर्व जागा लढणार असे दावे करणे सुरू केले आहेत. यापैकी अनेकांकडे सर्व प्रभागात लढविण्यासाठी दीडशे कार्यकर्तेसुद्धा नाहीत.
Read Also :
- पेगासस फोन टॅपिंग प्रकरणी: मोदी-शहांवर विश्वास नाही, मित्र पक्षातील बड्या नेंत्याची चौकशीची मागणी
- मुंबई विमानतळावर राडा करणाऱ्या शिवसैनिकांचे राऊतांकडून समर्थन
- आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे
- लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का?, भाजपचा खोचक सवाल
- औरंगाबाद पंचायत समितीत राडा; भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण