मुंबई: मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या एअरपोर्टचे संचालन आता अदानी ग्रुपकडे आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी एअरपोर्टवर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट’ च्या बोर्डची तोडफोड केली आणि तो उखडून फेकून दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कृतीचं समर्थन केलं आहे. शिवसैनिकांनी योग्यच केलं. त्यात चुकीचं काय केलं? असा सवाल करतानाच शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार प्रसार करत असेल तर शिवसेना सत्तेत असला तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल पाहिलं ना तुम्ही हे असंच होत राहणार, असं राऊत म्हणाले.
हे पण वाचा: आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे
शिवसेनेकडून तोडफोड
शिवसेनेने आरोप केला आहे, की आधी हे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नावाने ओळखले जात होते. मात्र आता येथे अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला. हे सहन केले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नाव असताना ‘अदानी एअरपोर्ट’, असे नाव येथे लावण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून भारतीय कामगार सेनेने अदानी एअपोर्ट नाव काढून टाकले, असे भारतीय कामगार सेनेचे सचिव संजय कदम यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा: औरंगाबाद पंचायत समितीत राडा; भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
काय म्हणाले होते अदानी
मुंबई विमानतळाचे टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले होते, जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही मुंबईचा गौरव वाटावे असे काम करू, हे आमचे वचन आहे. अदानी समूह व्यवसाय. लक्झरी आणि मनोरंजनासाठी भविष्यातील विमानतळांचे इकोसिस्टिम उभे करेल. आम्ही हजारो स्थानिक लोकांना नवा रोजगार देऊ.
Read Also :
- आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे
- लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का?, भाजपचा खोचक सवाल
- औरंगाबाद पंचायत समितीत राडा; भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
- छत्रपती शिवाजी महाराज नाव बदलून अदानी करणं योग्य नाही – नवाब मलिक
- चंद्रकांत पाटील यांची घोषणा, निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा