IMPIMP
No matter what happens, I want to take over the state of Maharashtra No matter what happens, I want to take over the state of Maharashtra

“काहीही झालं तरी मला महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचंय”, शरद पवारांनी ठोकला शड्डू

पुणे :  तीन- चार महिन्यांनी महाराष्ट्राची निवडणूक येणार आहे. माझा प्रयत्न हा आहे की, काहीही झालं तरी महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचं ते घ्यायचं असेल तर विधानसभा जिंकावी लागेल. ती वेळ माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल. त्यावेळेला आपलं काम असंच चालू ठेवा, चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्य हातामध्ये आणू. हे काही अशक्य नाही. असं शरद पवारांनी म्हटलं आहे. बारामतीच्या शीर्सुफल येथे त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा..“मोदी, शाह सोडाच परंतु मोहन भागवत देखील मणिपुरला गेले नाहीत”, राऊतांचा टोला 

तुम्ही लोकांनी मला चार वेळा निवडून दिलं. चार वेळा मुख्यमंत्री, दहा वेळा शेती मंत्री, दोन वर्ष संरक्षण खात्याचा मंत्री या सगळ्या गोष्टी तुम्हा लोकांच्या सामूहिक शक्तीने घडू शकतात. तुम्ही जे प्रश्न या ठिकाणी मांडले. त्या लगेचच्या लगेच सुटतील याचा प्रयत्न होईल. पण सांगता येत नाही कारण सरकार दुसऱ्याचं आहे. चार महिन्यांनी निवडणूक झाल्यानंतर राज्य हातात आल्यावर तुमची सुटका केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. असंही आवाहन शरद पवारांनी केलं.

हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, फायर ब्रॅंड नेत्या रूपाली पाटील पक्षाला देणार सोडचिठ्ठी ? 

दरम्यान,  या निवडणुकीकडे लक्ष देण्याचं आणि एवढी चर्चा होण्याचं कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या निवडणुकीत फार लक्ष घातलं. काही गोष्टी निवडणुकीत सांगायच्या नसतात, बोलायच्या नसतात.  त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यामुळे लोक अस्वस्थ झाली व त्यांचा निकाल मतपेटीतून दिला. जे काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले त्याचे मला लगेचच उत्तर देता येणार नाही, पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून यातून मार्ग काढेन. असं आश्वासन देखील शरद पवारांनी दिलंय.

READ ALSO :

हेही वाचा..“अखेर सुनेत्रा पवारांसाठी काठेवाडीत गुलाल उधळला, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल 

हेही वाचा…विधानसभेच्या २०० ते २५० जागा मनसे स्वबळावर लढणार ? महायुतीची चिंता वाढली ? 

हेही वाचा…“प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही,” राज्यसभेच्या उमेदवारीवरून डावलल्यानंतर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा…“लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, अजित पवार गटाचा आरएसएसवर पलटवार 

हेही वाचा..“रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार ? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ”, रूपाली पाटील ठाकरे गटाकडून ऑफर