नाशिक : गेल्या काही दिवसापासून महायुतीत नाशिक जागेसंदर्भात महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला आहे. नाशिकची जागा ही शिंदे गटाकडे असली तरी या जागेवर सुरूवातीला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपने दावा सांगितला होता. तर नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र दोन दिवसापुर्वी मंत्री भुजबळांनी माघार घेतल्याने आता समता परिषद आक्रमक झाली आहे. भुजबळांनी निवडणुक लढविण्यासाठी पुन्हा विचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळ यांनी माघार गेतल्याने आता समता परिषद मैदानात उतरली आहे. याच संदर्भात समता परिषदेने भुजबळ फॉर्म हाऊसवर मोठी बैठक आयोजित केली आहे. नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव जाहीर झाल्यानंतर समता परिषदेने सर्व तयारी केली होती. मात्र भुजबळांनी अचानक माघारी घेतल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. यातच आता पक्षाची नेमकी भूमिका काय ? महायुतीचा विचार काय आहे ? याबाबत आज समजून सांगण्याची या बैठकीत शक्यता आहे. छगन भुजबळ यांनी निवडणुकीत उभं राहावं असा ठराव देखील या बैठकीत मांडला जाऊ शकतो. त्यामुळेच ही बैठक अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
शिवसेना शिंदे गटासह भाजपने देखील नाशिकच्या जागेवर दावा सांगितला आहे. यातच भुजबळांनी माघार घेतल्यानंतर माळी समाजाने देखील भाजपवर गंभीर आरोप केला आहे. माळी विकास मिशन संघटना आक्रमक झाली आहे.
हेही वाचा…ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा
दरम्यान, नाशिक, अमरावती, वर्धा, धुळे यासाठी आमची लोकसंख्या मजबुत आहे. याठिकाणी भाजपकडून विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यकडून फार मोठी अपेक्षा होती. परंतु त्यांना आता माळी समाजाचा विसर पडला असावा. त्यांनी आमच्या समाजाला एकही तिकीट दिलेलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाहीय. भाजपने माळी समाजाला एक तरी उमेदवारी द्यावी. तरचं आम्ही विचार करू. आम्हाला खरोखरंच डावललं तर विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही. असा इशारा माळी विकास मिशन संघटनेने दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“हा माझा शब्द असून तो मी पाळणारच”, सुनेत्रा पवारांना नागरिकांना दिली ग्वाही
हेही वाचा…“अगोदर काय घडले हे विसरुन जा अन् उद्याचा उष:काल येण्यासाठी..,” तटकरेंनी केलं मोठं आवाहन
हेही वाचा….“आपल्या भागात विकास निधी खेचून आणण्यासाठी महायुतीला साथ द्या”, अर्चना पाटलांचं आवाहन
हेही वाचा….“पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची माझी तयारी”